जमीन, व्यावसायिक इमारती अन् निवासी घरं; DCM अजित पवारांपेक्षा पत्नी सुनेत्रा पवारच जास्त श्रीमंत, करोडोंमध्ये आहे आकडा

DCM Ajit Pawar wife Sunetra Pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाचं योगदान देणाऱ्या पवार कुटंबातील बरीच मंडळी सक्रीय राजकारणात सहभागी आहेत.   

सायली पाटील | Updated: Dec 13, 2024, 01:29 PM IST
जमीन, व्यावसायिक इमारती अन् निवासी घरं; DCM अजित पवारांपेक्षा पत्नी सुनेत्रा पवारच जास्त श्रीमंत, करोडोंमध्ये आहे आकडा title=
personality test your walking style might reveal about your inner thoughts

DCM Ajit Pawar wife Sunetra Pawar : महाराष्ट्रात सत्तास्थापना झाली आणि अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. इथं राज्याच्या राजकारणात अनेक खलबतं सुरू असतानाच नुकतंच उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली गाठली, जिथं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वासुद्धा उपस्थित होते. याच दिल्लीत अजित पवार यांनी बंडानंतर पहिल्यांदाच शरद पवार यांची प्रत्यक्ष भेट घेतली. निमित्त होतं ते म्हणजे शरद पवारांचा 85 वा वाढदिवस. 

पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार आणि सहकाऱ्यांसमवेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतील शरद पवार यांचं निवासस्थान गाठत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी या भेटीची जिकती चर्चा झाली तितकीच चर्चा राजकारणात गेली काही वर्ष सक्रीय सहभाग घेणाऱ्या त्यांच्या पत्नीची म्हणजे सुनेत्रा पवारांचीही झाली. 

सुनेत्रा पवार किती श्रीमंत आहेत? 

नेतेमंडळींच्या संपत्तीचा मुद्दा कायमच चर्चेचा विषय ठरतो. अगदी सुनेत्रा पवारही यास अपवाद नाहीत. त्यांच्याही नावावर कोट्यवधींच्या संपत्तीची नोंद आहे. myneta.info च्या माहितीनुसार सुनेत्रा पवारांवर 12 कोटी 14 लाख रुपये किमतीची शेतजमीन असून, अजित पवार आणि त्यांच्या पत्नीच्या नावे मिळून 13,21,47,740 रुपयांच्या शेतजमिनी आहेत. 

अजित पवारांपेक्षा त्यांच्या पत्नीच्या नावे अधिक बिगरशेतजमीन असून, या भूखंडाची किंमत 23 कोटींच्या घरात आहे. अजित पवार यांच्याकडे असणारी बिगरशेतजमीन 14 कोटी रुपयांच्या मूल्याची असल्याचं सांगितलं जातं. सुनेत्रा पवार यांच्या नावे 23 कोटींहून अधिक किमतीचं घर असून, अजित पवारांच्या नावावर असणाऱ्या घराची किंमत 9 कोटी रुपये इतकी सांगण्यात येते. त्यांच्या नावे एक व्यावसायिक इमारतही असून, त्याची किंमत 11 कोटी रुपये सांगितली जाते. 

हेसुद्धा वाचा : महाराष्ट्राचं राजकीय, सामाजिक भविष्य ठरवणारे गौतम अदानी आचार्य विनोबा भावे आहेत का? राऊतांचा सवाल 

शेतजमीन, बिगर शेतजमीन आणि घर अशा संपत्तीची एकूण आकडेवारी पाहिली असता अजित पवार यांच्याहून अधिक श्रीमंती सुनेत्रा पवार यांच्याकडे असल्याचं स्पष्ट होतं. लोकसभा निवडणुकीदरम्यानच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार 1,27,59,98,205 इतकी एकूण संपत्ती आहे. तर त्यांच्यावर 12,11,12,374 इतकं कर्जही आहे. रोख स्वरुपात त्यांच्याकडे 3,96, 450 इतकी रक्कम आहे.