अभिषेक अडेप्पा, झी मीडिया, सोलापूर : सोलापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात प्रेमसंबंधातून एका महिलेने पतीला लॉजवर नेऊन त्याचे गुप्तांग कापल्याची घटना घडली आहे. शरीरसंबंधास नकार दिल्याने पत्नीने हे हादरवणारं कृत्य केल्याचे समोर आलं आहे. पतीने दिलेल्या तक्रारीवरुन बार्शी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन पत्नीला अटक केली आहे. न्यायालयाने महिलेला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
युवकाने दिलेल्या फिर्यादीवरुन महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. सोलापूरातल्या बार्शी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आलं आहे. सुरुवातील ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर महिलेने जबरदस्तीने 24 वर्षीय तरुणाला विवाह करायला लावला होता. त्यानंतर तरुणीने तुझ्यासोबत बोलायचे आहे असे म्हणत बार्शीतील एका लॉजवर तरुणाला बोलावलं होतं. मात्र भेटल्यानंतर महिलेने तरुणासोबत शारिरीक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र पतीने त्याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलेने पतीच्या गुप्तांगावर वार केले. या सगळ्या प्रकारानंतर तरुणाला बार्शीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तरुणाने तक्रार दिल्यानंतर या महिलेला बार्शी पोलीसांनी अटक केली आली असून 26 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुख्याध्यापिकेचे विद्यार्थ्यासोबत अश्लिल कृत्य
बुलढाण्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेने आठ वर्षीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तणूक करत त्याचा लैंगिक छळ केला. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर मुख्याध्यापिकेविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पोलीस गुरुवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील जवळा येथील जिल्हा परिषद शाळेत केळी वाटण्यात आली होती. काळी पडलेली केळी का वाटली या मुद्द्यावरून पिडीत विद्यार्थ्याच्या वडिलांचा मुख्याध्यापिकेसोबत वाद झाला होता. दरम्यान या वादानंतर मुख्याध्यापिकेने पिडीत विद्यार्थ्याला दुपारी वर्गखोलीत बोलावले. माझी तक्रार वडिलांकडे करतो काय, बदली करायला लावतो काय, थांब तुला दाखवते असे म्हणत मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याची चड्डी सोडून विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ केला. त्यानंतर घाबरलेला विद्यार्थी पळत निघाला. पळताना शाळेत पडल्याने त्याच्या पायाला मार लागला अशी तक्रार विद्यार्थ्याच्या वडिलांनी शेगाव पोलिसात दिली आहे. तक्रारीवरून मुख्याध्यापीकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.