Who Is Rohit Walmik Karad Asking About: पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड हा संशयित म्हणून अटकेत आहे. कराडविरुद्ध मकोकाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तो 14 जानेवारीपासून 7 दिवसांच्या कोठडीमध्ये आहे. 14 तारखेला वाल्मिक कराडला केज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. त्यानंतर नियमानुसार त्याची मेडिकल टेस्ट करण्यासाठी त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. तिथून बाहेर निघताना वाल्मिक कराडची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याभोवती गराडा घातला. मात्र रुग्णालयातून बाहेर पडताना वाल्मिक कराड सातत्याने एकच प्रश्न विचारताना दिसत होता.
वाल्मिक कराडने मेडिकल चाचणीनंतर रुग्णालयातून बाहेर पडताना अनेकदा 'रोहित कुठे आहे?' असा प्रश्न विचारला. कराड सातत्याने रोहितबद्दल विचारणा करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा रोहित नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता आता भाजपाचे आमदार आणि हे प्रकरण उचलून धरणाऱ्या सुरेश धस यांनी वाल्मिक कराड रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर शोधत असलेला रोहित कोण आहे, याबद्दलची माहिती दिली आहे.
नक्की वाचा >> 'हा आका सोपा आका नाहीये, तो 50-50 लोकांना..'; धसांचं विधान! म्हणाले, 'रिल बघे नावाचा..'
वाल्मिक कराडला रुग्णालयातून चाचणीनंतर बाहेर आणण्यात आले. त्यावेळी प्रसारमाध्यमांबरोबरच कराडच्या समर्थकांनाही रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाल्मिक कराडला पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना तो 'रोहित कुठे आहे?' असा प्रश्न विचारताना दिसला. त्याचवेळी पोलीसही रोहित कुठे आहे याबद्दल विचारणा करत होते असं समजतं. आता सगळेच जण ज्या रोहितचा शोध घेत होता तो कोण आहे याबद्दल धस यांनी खुलासा केलाय.
नक्की वाचा >> वाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...'
धस यांना यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असतात त्यांनी, "रोहित हा त्याच्या (कराडच्या) हाताखाली काम करणारा कर्मचारी आहे. त्याचं पूर्ण नाव रोहित कांबळे असं आहे. त्याला (वाल्मिक कराडला) त्याची मदत लागत असेल. त्यालाही पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसून नेलं," असं सांगितलं.