Santosh Deshmukh Murder Case CDI Investigation Shocking Fact: बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये सीआयकडीकडून चौकशी सुरु असतानाच एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणामध्ये चौकशीदरम्यान संतोष देशमुख यांच्या अपहरणाच्या आधीच अशाच प्रकारचे एक अपहरण झालं होतं. त्या प्रकरणामध्ये कारवाई झाली असती तर प्रकरण संतोष देशमुखच्या हत्येपर्यंत पोहोचलं नसतं, असं म्हटलं जात आहे.
पवनचक्की कंपनी अवादाकडून खंडणी मागण्याच्या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये 2 कोटीच्या खंडणीसाठी कंपनीचे प्रोजेक्ट हेड सुनील शिंदे यांचे 28 मे 2024 रोजी गावठी कट्टा दाखवून अपहरण झाले होते, अशी धक्कादायक महिती समोर आली आहे. रमेश घुले आणि त्याच्या 12 साथीदारांनी मस्साजोग परिसरातून सुनील शिंदेंचं अपहरण केलं होतं. यासंदर्भातील उल्लेख सदर प्रकरणाच्या एफआयआर कॉपीमध्ये आहे. सुनील शिंदे त्यांच्या साथीदारांसह साइटवरुन केज गेस्ट हाऊसमध्ये जेवायला जात असताना एका गाडीने त्यांच्या गाडीला थांबवलं. त्यातून काही लोक खाली उतरले आणि गावठी कट्टा दाखवत सुनील शिंदे यांना दुसऱ्या गाडीमध्ये बसवण्यात आलं.
आरोपींनी सुनील शिंदेंना आपल्या गाडीत बसवलं आणि एका ठिकाणी हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथं आरोपींनी त्या हॉटेलचे शटर लावून पवनचक्कीच्या संदर्भातील रस्त्यांचे आणि इतर कामे आम्हाला दिले नाही तर महाग पडेल अशी धमकी सुनील शिंदेंना दिली. इतकेच नाही तर आमच्या भागात आमच्या परवानगी शिवाय जमीन अधिग्रहण कसे करताय तुम्हाला यासाठी दोन कोटी रुपये खंडणी द्यावी लागेल, असेही रमेश घुले आणि त्यांच्या साथीदारांनी म्हटल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> वाल्मिकच्या पत्नीकडे सुरेश धसांचे Video? प्रश्न ऐकताच धस म्हणाले, 'लय धुतल्या तांदळासारखा...'
रमेश घुले याने जमीन अधिग्रहण करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्याला भगवानगड येथे बोलावले. त्यानंतर रमेश सुनील शिंदेंसह तिथे त्याला भेटायला गेला. मात्र हे सर्वजण रस्त्यावर थांबले असताना पोलीस आले आणि त्यानंतर रमेश घुले आणि त्यांच्या साथीदारांनी तिथून पळ काढला म्हणून शिंदे आणि त्यांचे एक सहकारी सुटू शकले. याबाबत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खंडणीसाठी सुरू असलेले हे प्रकरण गेली वर्षभर अशाच पद्धतीने सुरू असल्याचं म्हणता येईल.
नक्की पाहा हे फोटो >> 29 लाखाचं सोनं, 5 घरं, 8 कोटींची जमीन अन्...; वादात अडकलेल्या धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती किती?
सुनील शिंदे अपहरण प्रकरणात रमेश घुलेवर काय कारवाई झाली होती याबाबत अजून काहीही माहिती नाही. कदाचित त्याचवेळी या प्रकरणात कडक कारवाई केली असती तर संतोष देशमुखापर्यंत हे प्रकरण आलेच नसते आणि त्यांचा जीव वाचला असता.