महाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट

धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करणारे भाजप आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची गुप्त भेट झाली. चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांची भेट घडवून आणली. मात्र, या भेटीवरुन आरोप प्रत्यारोप होऊ लागल्यावर आता सुरेश धस बॅकफूटवर गेलेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट कशासाठी झाली यावरून आता चर्चांणा उधाण आल आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 15, 2025, 10:16 PM IST
महाराष्ट्राच्या राजकारणात सिक्रेट घडामोडी! धनंजय मुंडे आणि सरेश धस यांची गुप्त भेट title=

Dhananjay Munde Suresh Dhas : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून  भाजप आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना सातत्यानं अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावरून विरोधकांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. मात्र एकीकडे मुंडेंवर आरोपींच्या फैरी झाडणारे सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंमध्ये गुप्त भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये काही तासात चर्चा झाल्याची बातमी समोर आल्यानंतर सुरेश धस बॅकफुटवर गेले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोन्ही नेत्यांची भेट घडवून आणली. त्यावरून चौहूबाजून टीका होत असल्यानं आता सुरेश धस यांनी भूमिका स्पष्ट केली.  

सुरेश धस आणि धनंजय मुंडेंची भेट घडवून आणल्यानं बावनकुळेही टीकेचे धन होत आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांची भेट राजकीय तडजोड करण्यासाठी घडवून आणली नसल्याचं चंद्रशेखर बानवकुळेंनी स्पष्ट केले.
सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीत  राजकीय तोडजोड करण्याचा हेतू नसल्याचं सांगत विखे पाटील यांनी बावनकुळेंच्या भूमिकेचं समर्थन केलंय. तर दुसरीकडे धनंजय मुंडेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सुरेश धस गेले होते. भेटीत काय झालं याची महिती नसल्याचं सांगत सुनील तटकरेंनी मात्र अधिक बोलणं टाळलं.

सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनं धक्का बसला मात्र कोणत्याही परिस्थितीत सुरेश धस भूमिका बदलणार नसल्याचा विश्वास सुप्रिया सुळेंनी व्यक्त केलाय.  धनंजय मुंडेंवर सातत्यानं आणि गंभीर आरोप करणाऱ्या सुरेश धस यांनी त्यांची भेट घेतल्यानं राज्याच्या राजकारणात त्याचे तीव्र पडसाद उमटले. दोन्ही नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी तर बावनकुळेंनी पुढाकार घेतला नाही ना असा सवालही या भेटीनंतर उपस्थित होतो.. त्यामुळे बीड प्रकरणी सुरेश धस पुढे काय भूमिका घेणार हे आता पाहावं लागणार आहे.