सोन्याचे दर कमी होईना! आजची सोनं महागलं, काय आहेत 24 कॅरेटचे दर!

Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. काय आहेत आजचे दर जाणून घ्या. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 19, 2025, 11:58 AM IST
सोन्याचे दर कमी होईना! आजची सोनं महागलं, काय आहेत 24 कॅरेटचे दर!
Gold Rate Today latest update on mcx silver price high in india check rates

Gold Rate Today: सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना पाहायला मिळत आहेत. आज सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र सोन्याची झळाळी कायम आहे. आज सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. तर, चांदीची चमकदेखील वाढली आहे. चांदी 198 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळं आता एमसीएक्सवर 96,650 रुपयांवर ट्रेड करत आहे. 

कमोडिटी मार्केटमध्ये सध्या मोठी खळबळ असल्याचे पाहायला मिळतेय. अलीकडेच सोन्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. जर सोन्याचे दर असेच चढ राहिले तर लवकरच प्रतितोळा सोनं 90 हजारांवर पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांचे प्रशासन युक्रेनमधील युद्ध संपवण्याच्या हेतूने रशियासोबत बातचीत करण्यास सहमत झाले आहे. त्यामुळं येणाऱ्या दिवसात सोन्याचे दर कमी होऊ शकतात, असं भाकित वर्तवण्यात येत आहे. सोनं 0.2 टक्क्यांनी कमी होऊन 2,928.52 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. अमेरिकेत सोन्याचा वायदा 0.1 टक्क्यांनी घटून 2,945.90 डॉलरवर पोहोचले आहेत. 

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 650 रुपयांची वाढ होऊन सोनं 80,350 रुपयांवर पोहोचले आहे. तर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 530 रुपयांची वाढ होऊन 65,740 रुपयांवर पोहोचले आहे. 

आज काय आहेत सोन्याचे भाव?

ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  80,350 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट 87,650 रुपये
10 ग्रॅम    18 कॅरेट  65,740रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   8,035 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   8,765 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    6,574 रुपये

ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   64,280 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   70,120 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    52,592 रुपये

मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?

22 कॅरेट- 80,350 रुपये
24 कॅरेट- 87,650 रुपये
18 कॅरेट- 65,740रुपये