पुण्यातील सर्वात मोठा प्रकल्प; येरवडा ते कात्रज बोगदा; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत

पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. मेट्रो, पूल अनेक पर्यायी व्यवस्था तयार केल्या जात असल्या तरी पुण्यातील वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याासाठी सर्वात मोठा प्रकल्प राबवला जात आहे. पुण्यातील येरवडा ते कात्रज हा प्रवास बोगद्यातून होणार आहे. या बोगद्यामुळे  45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे.  

वनिता कांबळे | Updated: Feb 15, 2025, 09:37 PM IST
पुण्यातील सर्वात मोठा प्रकल्प; येरवडा ते कात्रज बोगदा; 45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत   title=

Katraj to Yerwada Tunnel : पुणे हे महाराष्ट्रातील सर्वात झपाट्याने विकसीत होत असलेले शहर आहे. मेट्रो, पूल अनेक पर्यायी व्यवस्था तयार केल्या जात असल्या तरी पुण्यातील वाहतूक कोंडी ही सर्वात मोठी समस्या आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्याासाठी सर्वात मोठा प्रकल्प राबवला जात आहे. पुण्यातील येरवडा ते कात्रज हा प्रवास बोगद्यातून होणार आहे. या बोगद्यामुळे  45 मिनिटांचा प्रवास फक्त 20 मिनिटांत होणार आहे.  

राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आल्यापासून पुण्यातील अनेक महत्वकांक्षी प्रकल्पांना गती मिळत आहे. याच प्रकल्पाअंतर्गत पुण्यात नवा भुमिगत बोगदा (Underground Tunnel) तयार केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिगत बोगदा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. कात्रज ते येरवडा असा असणार आहे. यासाठी प्रति किलोमीटर 400 कोटी रूपयां खर्च अपेक्षित आहे.

20 किलोमीटर लांबीचा हा बोगदा पुण्यतील वाहतूक कोंडी सोडवणार आहे.  येरवडा ते कात्रज प्रवास बोगदा प्रकल्पासंदर्भात मुंबईत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 'पीएमआरडीए'ची बैठक झाली. या बैठकीत 'पीएमआरडीए'च्या 4,503 कोटी रूपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता देण्यात आली.  यावेळी पीएमआरडीएने कात्रज ते येरवडा असा बोगदा करण्याचा प्रस्ताव मांडला.  या प्रकल्पाचा आराखडा लवकारत लवकर तयार करावा. या प्रकल्पासाठी 'ट्विन टनल' या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

येरवडा ते कात्रज हे अंतर अंदाजे 15 किमी आहे. या प्रवासासाठी 45 मिनिटे लागतात. ट्रॅफिक असल्यास कधी कधी दीड दोन तास प्रवासी वाहतूक कोंडीत अडकतात. या मार्गावर दिवसभर प्रचंड वाहतूक असते. या बोगद्यामुळे प्रवाशांना याचा फायदा होईल.  पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातून हा नवा बोगदा जाणार आहे. यामुळे मुख्य रस्त्यांवरील गर्दी कमी होईल. हा बोगदा पुण्याच्या दक्षिण ते उत्तर या भागाला जोडणार आहे. येरवडा ते कात्रज या प्रवासासाठी फक्त 20 मिनिटांचा वेळ लागणार आहे. हा बोगदा कुठून सुरु होणार, कुठून बाहेर पडता येणार?, या बोगद्याचे भूमिपूजन कधी होणार? याबाबतची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.