मुस्लिम कुटुंबात जन्मली तरी हिंदु कशी काय? 'ही' अभिनेत्री एका घटनेमुळे आजही अविवाहित

1910-80च्या दशकतील बॉलिवूड अभिनेत्री आशा सचदेव यांच्या आयुष्याबद्दल एक मनोरंजक गोष्ट आहे ज्या अनेकांना माहिती नाहीत. आशा सचदेव यांचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. पण, नंतर त्यांनी हिंदू धर्म स्वीकारला. जाणून घ्या या घटनेचं नेमकं सत्य काय? 

Updated: Feb 10, 2025, 06:02 PM IST
मुस्लिम कुटुंबात जन्मली तरी हिंदु कशी काय? 'ही' अभिनेत्री एका घटनेमुळे आजही अविवाहित title=

Aasha Sachdeva: आशा सचदेव यांनी चित्रपटातील सुंदर अभिनयाने लाखो लोकांना वेड लावले. त्यांनी चित्रपटांमध्ये जवळपास सर्व प्रकारची भूमिका साकारल्या आहेत. एवढंच नाही तर त्यांना एका चित्रपटात फक्त एकच गाणं मिळालं आणि त्यातही त्यांनी एकदम कमाल केली. भूमिका लहान असो किंवा मोठी त्यांनी अभिनयात कोणतीच उणीव ठेवली नाही. आशा सचदेव खरंतर मुस्लिम कुटंबात जन्माला आल्या पण आयुष्याने असं वळण घेतलं की त्या हिंदु झाल्या. एका हिंदु नावानेच त्या सिनेसृष्टीत प्रसिद्ध झाल्या.

आशा सचदेव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचं खरं नाव नफीसा सुलतान आहे, या 1970 आणि 1980 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री होत्या. नफीसा सुलतान यांचा जन्म 27 मे 1956 ला अशिक हुसेन वारसी आणि रझिया यांच्या घरी झाला. त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर, आई रझियाने आय.पी. सचदेव या विख्यात वकिलाशी पुनर्विवाह केला आणि स्वतःचे नाव बदलून रंजना सचदेव तर मुलीचे नाव बदलून आशा सचदेव असे ठेवले.

आशा सचदेव यांनी 1970 आणि 1980 च्या दशकात अ‍ॅजंट विनोद, मेहबूबा, सत्ते पे सत्ता, वो मैं नहीं आणि इतर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. 2000 च्या दशकात त्या फिजा, झूम बराबर झूम आणि आजा नचले या चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारताना दिसल्या.

हे ही वाचा: अमिताभ आणि रेखाच्या नात्याबद्दल शत्रुघ्न सिन्हाकडून खुलासा; 'ते दोघे मेकअप रुममध्ये...'

आशा सचदेव यांनी 1986-87 दरम्यान दूरदर्शनवरील 'बुनियाद' या गाजलेल्या मालिकेत शन्नो ही महत्त्वाची भूमिका साकारली. भारताच्या फाळणीवर आधारित ही मालिका 105 भागांमध्ये प्रसारित झाली आणि नंतर अनेक वेळा रि-रिलिज करण्यात आली.

अभिनेत्री आशा सचदेव यांचा किसनलाल यांच्याशी साखरपुडा झाला. त्यानंतर लग्नाच्या काही दिवसांपूर्वीच त्यांचा अपघातात मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर, आशा सचदेव यांनी अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला. आशा सचदेव यांच्या आई रझियाचा घटस्फोट झाल्यानंतर, त्यांच्या वडिलांनीदेखील दुसरे लग्न करुन घेतले. दुसऱ्या लग्नातून अरशद वारसी हा मुलगा झाला. तो आज एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता असून आशा सचदेव यांचा सावत्र भाऊ आहे.