Rahul Solapurkar: छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त विधान राहुल सोलापूरकर यांना भोवले आहे. राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात पुण्यातील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणं अभिनेता राहुल सोलापूरकरला चांगलंच महागात पडल आहे. पुण्यातील पर्वती पोलीस स्टेशनमध्ये राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड या संघटनेनं ही तक्रार दाखल केली आहे. सोलापूरकर यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून त्याला तातडीनं अटक करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड या संघटनेनं केली आहे.
राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत राहुल सोलापूरकरनं वादग्रस्त विधान केलं. त्याच्या विधानाचे तीव्र पडसाद उमटले. राज्यभरातून संतापाची लाट उसळली. त्यानंतर सोलापूरकर यांनी माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
सोलापूरकर यांनी माफी मागितली असली तरी संतापाचा उद्रेक झाल्याचे पहायला मिळत आहे. सोलापूरकर यांच्या पुण्यातील घराबाहेर भीम आर्मी आणि भीम शक्तीनं आंदोलन केले. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हातात घेऊन आंदोलन करण्यात आलं. सोलापूरकरच्या विधानाचा निषेध करत त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे.
मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखती दरम्यान बोलताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत एक वादग्रस्त विधान केलं होतं. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं आणि वेदानुसार बाबासाहेब ब्राम्हण ठरतात असं विधान केल्याचे समजते.
समाजाचे आदर्श आणि महापुरुषांबद्दल बोलताना तारतम्य बाळगणं महत्त्वाचं असतं. इतिहासाचं अचूक ज्ञान आणि माहितीशिवाय वक्तव्यं करणं चूक आहे. सामाजिक तणाव निर्माण होईल अशाप्रकारची वादग्रस्त विधानं महापुरुषांबाबत करु नयेत असं आवाहन राज्य सरकारनंही केलंय.