Magh Purnima 2025 : हिंदू धर्मात पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला अतिशय महत्त्व आहे. पौर्णिमा तिथी हे दर महिन्यात येते. पौर्णिमा तिथीला स्नान, दान आणि व्रताला विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी कधी याबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. 11 की 12 फेब्रुवारी नेमकं कुठल्या दिवशी माघ पौर्णिमेचं व्रत ठेवायचं याबद्दल संभ्रम आहे. त्यामुळे अशात माघ पौर्णिमेची योग्य तिथी, शुभ मुहूर्तबद्दल जाणून घेऊयात.
वैदिही पंचांगानुसार, माघ पौर्णिमेचे व्रत 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:41 वाजेपासून पौर्णिमा तिथी 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:53 पर्यंत असणार आहे. त्यामुळे नेमकं कुठल्या तारखेला पौर्णिमा साजरी करावी असा प्रश्न लोकांसमोर पडलाय. उदय तिथीनुसार माघ पौर्णिमेचा उपवास 12 फेब्रुवारी रोजीच पाळायचा आहे. खरंतर शास्त्रांमध्ये असं म्हटलंय, की पौर्णिमा व्रत फक्त तेव्हाच पाळले जाते जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते. अशा परिस्थितीत, चंद्र देवाला जल अर्पण 12 तारखेला सूर्यास्ताच्या वेळी करायचे आहे. प्रदोष काळात पौर्णिमा 12 फेब्रुवारी रोजी येत असल्याने, 12 तारखेलाच उपवास करणे चांगले मानले जात आहे. याशिवाय, 12 तारखेला पौर्णिमेचे स्नान आणि दान देखील करणे शुभ मानले गेले आहेत.
खरं तर, शास्त्रांमध्ये माघ महिन्याला विशेष महत्त्व आहे. माघ महिना कार्तिक महिन्याइतकाच शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत, माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे महत्त्व देखील खूप जास्त आहे. माघ शुक्ल पौर्णिमेला सकाळी स्नान केल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करा, पूर्वजांचे श्राद्ध करा, निराधारांना अन्न, वस्त्र आणि निवारा द्या, तीळ, चादरी, कापूस, गूळ, तूप, मोदक, फळे, धान्य आणि सोने इत्यादींचे दान करा आणि उपवासानंतर ब्राह्मणांना जेवण द्या आणि कथा सांगा.
माघ पौर्णिमेचा चंद्र 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता दिसणार आहे. तर पौर्णिमा तिथी संध्याकाळी 6:53 पर्यंत राहील. अशा परिस्थितीत, चंद्राला अर्घ्य अर्पण करण्याची वेळ 6 वाजल्यापासून 6:53 पर्यंत असणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)