मयूर निकम, झी मीडिया, बुलढाणा: बुलढाण्यातील सर्वात मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेला नळगंगा प्रकल्पाच्या (Nalganga Project) प्रतिबंधित क्षेत्रात म्हणजेच प्रकल्पाच्या भिंतीवर व गेट वर काही अधिकारी आपल्या परिवारासह काल बिनधास्तपणे फिरताना आढळून आले. इतकच नाही तर प्रकल्पाच्या भिंतीवर अधिकाऱ्यांनी आपल्या बाईक्स तसेच वाहने सुद्धा नेली होती. जिथे सामान्यांना जाण्यास मज्जाव आहे तिथल्याच परिसराता ही लोकं बाईक राईड करताना दिसले. (office children bike ride at nalganga dam project in highly restricted areas with family)
इतकच काय तर अधिकाऱ्यांच्या परिवारातील सदस्यांना प्रकल्पाचे गेट उघडून पाण्याचा विसर्ग कसा करतात हे दाखविण्यात आल्याचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागला आहे. मात्र कालच गुजरातमधील मोरबीची घटना ताजी असताना अशाप्रकारे एखाद्या मोठ्या धरणाचे दरवाजे बिना परवानगी उघडणे कितीपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होतोय.
बुलढाण्याच्या मोताळा तालुक्यातील नळगंगा प्रकल्पावर आपल्या परिवारासह पिकनिक करायला आलेले सिंचन विभागाचे उपविभागीय अधिकारी एस.पी.पाटील आपल्या मुलांबळांसह धरणाच्या अतिशय संवेदनशील व प्रतिबंधित असलेल्या क्षेत्रांत म्हणजे धरणाच्या भिंतीवर व गेट वर अगदी मुक्त संचार करताना दिसले.
आपल्या परिवारातील सदस्यांना धरणाचे दरवाजे कसे उघडतात. कसा पाण्याचा विसर्ग केल्या जातो याचीही माहिती आहे. इतकंच काय तर आपल्या मुलींना धरणाच्या भिंतीवर बाईक राईडचा आनंद ही घेऊ देतात. खरं तर पाटील सिंचन विभागाचे अधिकारी असूनही ते इतके बेजवाबदारीने वागत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. मात्र त्याना विचारणा केली असता त्यांनी परिवारासह गेलो नव्हतो तर धरणाच्या गेटच मेंटेनन्स करायला गेलो होतो असं बेजबाबदार उत्तरही दिलं आहे. कुठल्याही धरणाचे गेट हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवनवगी शिवाय व धरणाखालील गावाना सूचना देऊन उघडली जातात मात्र काल बिना परवानगी गेट उघण्यात आलं याला जवाबदार कोण असा सवाल उपस्थित रहतो आहे.