ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरु झाल्या आहेत अनेकजण फिरायला जाण्याचा निर्णय घेतात. पण घराबाहेर पडताना या महत्त्वाच्या बातम्या पाहणे अत्यंत गरजेचे आहे. ख्रिसमस पाठोपाठ थर्टीफस्टचा उत्साह देखील लोकांमध्ये असतो. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी अनेक लोकं वेगवेगळ्या पर्यटनस्थळांवर जातात. अशावेळी तेथी माहिती असणे अत्यंत गरजेचे असते.
25 डिसेंबर ख्रिसमसपासूनच लोकं सुट्टीवर गेले आहेत. या दिवसांमध्ये शाळांना देखील सुट्टी असते. अशावेळी अनेक कुटुंब बाहेर जाण्याचा प्लान करतात. फॅमिली पिकनिक म्हणून अलिबाग हे सर्वाच आवडीचं ठिकाण आहे. पण अलिबाग येथे प्रशासनाने 28 आणि 29 डिसेंबर रोजी जड वाहनांना बंदी केली आहे.
अलिबाग, मुरूड तालुक्यात 2 दिवस म्हणजे 28 आणि 29 डिसेंबर रोजी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. 28 आणि 29 डिसेंबर या दोन दिवशी अवजड वाहनांना बंदी असणारे. या दोन्ही दिवशी सुट्ट्या असल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढू शकते. त्यांचा प्रवास सुखाचा व्हावा यासाठी अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
अनेकदा जड वाहने रस्त्यांवर असल्यामुळे जास्त ट्रॅफिक जॅमची शक्यता असते. तसेच या वाहनांमुळे अपघात होण्याची देखील दाट शक्यता असते. या सगळ्याचा विचार करतो हा निर्णय घेण्यात आला आहे.
नववर्षांच्या स्वागताला पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या अतिरिक्त लोकल धावणार आहेत. नववर्षांच्या पूर्वसंध्येला मुंबईत चालणार 12 अतिरिक्त लोकल सोडल्या जाणार आहेत. 31 डिसेंबरच्या रात्रीपासून 1 जानेवारी पहाटेपर्यंत अतिरिक्त लोकल धावणार आहेत. पश्चिम रेल्वेवर 8 अतिरिक्त लोकल चर्चगेट ते विरारदरम्यान धावणार आहेत. तर मध्य रेल्वेवर 4 अतिरिक्त लोकल धावमार आहेत. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण आणि पनवेल अशा या स्पेशल ट्रेन असणार आहेत.