पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदाही नाशिकच्या त्रंबकेश्वर येथून आषाढी एकादशीसाठी निवृत्तींनाथ महाराजांची पालखी निघणार आहे.आषाढी एकादशीसाठी सातपैकी ही एक पालखी महत्वाची आणि मानाची असते.. जवळपास पंचवीस हजार वारकरी आणि इतर मंडळी उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे. मोठ्या उत्साहात आणि परांपरिक पद्धतीने पालखीचे प्रस्थान होणार आहे.
चांदीचा रथ,बैलगाडीतील नगारा, अश्वरिंगण ही पालखीची वैशिष्ट्य आहेत. रथाच्या पुढे अश्वपथक,बॅण्डपथक, पारंपारिक अभंग म्हणत, रामकृष्म हरी, पुंडलिक वरदे व हरी विठ्ठल असा गजर होतोय. श्रीक्षेत्र कुशावर्त येथे नाथांना शाहीस्नान घातलं जाईल. त्र्यंबकराज्याचे दर्शन घेऊन अनेक दिंडी चालक, मालक त्र्यंबकेश्वरमधून पायी वारीत सहभागी होणार आहेत.