Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! मुलाच्या लग्नाला 20 दिवस उरले असतानाच आई-वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल

Nashik News Today: नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उच्चभ्रवस्ती पती-पत्नीच्या आत्महत्यने खळबळ माजली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 7, 2025, 03:08 PM IST
Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! मुलाच्या लग्नाला 20 दिवस उरले असतानाच आई-वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल title=
nashik news 20 days before their son wedding mother and father suicide

Nashik Crime News: मुलाच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई-वडिलांनी धक्कादायक पाऊल उचलले असल्याची माहिती समोर येत आहे. नाशिक शहरातील टिळकवाडी परिसरामध्ये घडली आहे. 26 जानेवारीच्या दिवशी मुलाचं लग्न होतं त्याचीच तयारी घरात सुरू होती. त्याचवेळी जयेश रसिका शहा आणि त्यांची पत्नी रक्षा या दोघांनीही आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

जयेश शहा आणि रक्षा शहा या दोघांनीही कुटुंबासोबत रात्री जेवण केले. त्यानंतर त्यांची दोन्ही मुलं घराबाहेर गेली होती.  घरात दोघेच असलेल्या व्यावसायिकाने आपल्या पत्नीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या टिळकवाडीतील यशोकृपा या बंगल्यात घडली आहे. हा प्रकार सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आलाय. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवला आहे. मात्र, त्यांच्या मृत्यनंतर संशय घातपात आहे का? असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे. 

हा दाम्पत्याने आपल्या दोघा मुलांसमवेत रविवारी रात्री नेहमीप्रमाणे १० वाजेच्या सुमारास जेवण केले. त्यानंतर दोघेही मुले त्यांच्या कामासाठी बाहेर गेले. त्यानंतर शहा पती-पत्नी त्यांच्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते.  त्यानंतर तासाभराने साधारणतः ११.३० वाजेच्या सुमारास रक्षा शहा यांनी आपला मोठा मुलगा कौशल यास फोन केला. फोनवर त्या अडखळत घाबरलेल्या स्थितीत बोलत असल्याचे कौशलच्या लक्षात आले. 

फोन ठेवताच मुलाने घरी धाव घेतली असता त्याला खोलीत दोघेही बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्याने लगेचच दोघांना कारमधून नेत जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने दोघांनाही सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारारदम्यान पहाटे दोघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यावर अधिक तपास सरकार वाडा पोलीस करत आहे.