MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज

Mhada Lottery 2023: म्हाडा लॉटरी 2023 नवीन अपडेट समोर येतं आहे. आता म्हाडा कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Mhada Kokan Region)  एक नवीन खूशखबर आली आहे. आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज (How to apply for Mhada) करू शकता, कसं जाणून घ्या? 

Updated: Mar 8, 2023, 07:11 PM IST
MHADA Lottery 2023: खूशखबर! हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार...4640 सदनिकांसाठी करू शकतात अर्ज title=
MHADA Lottery 2023 people now apply for 4640 tenement house read the full article for update

Mhada Lottery 2023: म्हाडाकडून अनेकांची स्वप्न साकार झाली आहेत. अनेकांना गेल्या काही दिवसांत चांगली लॉटरीही (Lottery) लागली आहे. आता म्हाडाकडून अशीतच एक गुडन्यूज येते आहे. म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (Kokan) ठाणे शहर व जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत 4640 सदनिका (tenement house) व 14 भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचे (म्हाडा) सचिव श्री. राजकुमार सागर यांच्या हस्ते व कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. मारोती मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रारंभ करण्यात आला आहे. त्यामुळे आता म्हाडाच्या सदनिका तुम्ही अर्ज करू शकतात. (MHADA Lottery 2023 people now apply for 4640 tenement house read the full article for update)

मंडळातर्फे सदनिका व भूखंड विक्रीसाठी ऑनलाईन संगणकीय सोडत 10 मे, 2023 रोजी सकाळी 10.00. वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे काढण्यात येणार आहे.  म्हाडातर्फे तयार करण्यात आलेल्या IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management system) या नूतन संगणकीय प्रणालीनुसार नोंदणीकरणादरम्यान सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार हे पात्र अर्जदार ठरणार आहेत.  

 IHLMS 2.0 नक्की काय आहे? 

IHLMS 2.0 या नूतन संगणकीय प्रणाली व ऍपच्या साहाय्याने सदनिकांच्या अर्ज नोंदणी प्रक्रियेस आज दुपारी 12.00 वाजेपासून सुरवात झाली. नवीन आज्ञावली नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने उत्कृष्ट ठरणार आहे कारण अर्जदार घरबसल्या अथवा कुठूनही सोडत प्रक्रियेत सहभाग घेऊ शकतात. नोंदणीकरण, कागदपत्र अपलोड करणे आणि ऑनलाईन पेमेंट यांसारख्या सुविधा या प्रणालीच्या माध्यमातून सहजरित्या उपलब्ध होणार आहेत. सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios)या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमच्या साहाय्याने आपल्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतात. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता  https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज नोंदणी प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. अर्जदारांना नवीन संगणकीय प्रणालीची माहिती देणारी मार्गदर्शनपर माहितीपुस्तिका, ध्वनीचित्रफिती, हेल्प फाईल आणि हेल्प साईट या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहितीचे अवलोकन करावे, असे आवाहन कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी मारोती मोरे यांनी केले आहे.  

कसा कराल अर्ज? 

IHLMS 2.0 या संगणकीय प्रणाली अंतर्गत अर्ज नोंदणी जरी अमर्याद काळ सुरु राहणार असली तरी कोंकण मंडळाने जाहीर केलेल्या सदनिका विक्री सोडतीत अर्जदार 10 एप्रिल, 2023 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत सहभाग घेऊ शकतात. त्यानंतर सोडतीत सहभाग घेण्याची लिंक या प्रणालीवरून निष्क्रिय करण्यात येणार आहे.  दिनांक 12 एप्रिल, 2023 रात्री 11.59 पर्यंत अर्जदार अनामत रक्कमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील, तसेच दिनांक 12 एप्रिल, 2023 रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. अशाप्रकारे सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदाराच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 4 मे, 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 10 मे, 2023 रोजी सकाळी 10 वाजता पात्र अर्जाची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार असून अर्जदारांना सोडतीचा निकाल तात्काळ मोबाईलवर एसएमएस द्वारे, ई-मेल द्वारे तसेच ऍपवर प्राप्त होणार आहे. 

कुठे कराल संपर्क? 

सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी 984 सदनिका, 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 1456 सदनिका उपलब्ध असणार आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 14 भूखंड व 152 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2048 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सोडतीसंदर्भात अर्ज भरतांना अर्जदारांना येणार्‍या अडचणीचे निराकरण करण्यासाठी 022 - 69468100 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.