महिलांच्या Underwear धुण्याच्या पावडरवरुन 'शार्क टँक'मध्ये राडा! नमिता-अनुपम भिडले; नमिता म्हणाली, 'योनीमार्गाचा संसर्ग..'

Shark Tank India Underwear Wash Fight: शार्क टँक इंडियामध्ये आलेल्या एका विवाहित जोडप्याने शार्क्स समोर ठेवलेला प्रोडक्ट पाहून बरेच मतभेद झाले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 11, 2025, 01:40 PM IST
महिलांच्या Underwear धुण्याच्या पावडरवरुन 'शार्क टँक'मध्ये राडा! नमिता-अनुपम भिडले; नमिता म्हणाली, 'योनीमार्गाचा संसर्ग..' title=
या कंपनीत दोन शार्क्सने केली गुंतवणूक (प्रातिनिधिक फोटो)

Shark Tank India Underwear Wash Fight: शार्क टँक इंडियाच्या नुकत्या झालेल्या एका भागामध्ये समिक्षा आणि राहुल हे विवाहित जोडपं सहभागी झालं होतं. आपल्या उद्योगामध्ये शार्क्सकडून गुंतवणूक हवी म्हणून त्यांनी प्रपोजल मांडलं. मात्र या दोघांनी ज्या प्रोडक्टसाठी गुंतवणूक मागितली त्यावरुन शार्क्समध्येच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. खरं तर हे प्रोडक्टही तसं हटके पण तितकचं मतभेद असलेलं होतं. समिक्षा आणि राहुल या दोघांनी 'युग्स' नावाची अंडरवेअर धुण्याची डिटर्जंट पावडर तयार केली असून त्यासाठीच ते गुंतवणूक मागायला आले होते. 

अनुपम मित्तलने विचारलं याची गरज काय?

समिक्षा आणि राहुल या दोघांनी त्यांची ही अंडरवेअर धुण्यासाठीची विशेष डिटर्जंट पावडर ही खास करुन महिला ग्राहकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली असल्याचं सांगितलं. ही अशी महिलांसाठी आहे ज्यांना आपली अंतवर्स्र खास करुन अंडरपॅण्ट वॉशिंग मशीनमध्ये धुवायला आवडत नाही, असं या दोघांनी शार्क्सला सांगितलं. मात्र अनुपम मित्तलने या असल्या प्रोडक्टची खरच गरज आहे का असा सवाल उपस्थित केला. "तुम्ही वॉशिंग मशिनबद्दल ऐकलं आहे का? त्यामध्ये सगळ्या प्रकारच्या पावडर वापरतात येतात. क्लिन, ग्रीन किंवा कोणत्याही पावडर अथवा डिसइन्फेटंट वापरलं तरी काम होतं. तुम्ही उगाच गोष्टी का अवघड करुन ठेवताय?" असा प्रश्न अनुपमने विचारल्यावर या दोघांनी वेगळी पावडर का बनवलं हे सांगितलं.

नमिता थापरने केलं समर्थन! म्हणाली, 'योगीमार्गातील संसर्ग...'

समिक्षा आणि राहुल या दोघांनी अनुपच्या प्रश्नाला उत्तर देताना ज्या महिलांना आपल्या अंडरपॅण्ट इतरांच्या कपड्यांबरोबर वॉशिंग मशीनमध्ये धुवायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे प्रोडक्ट आहे. महिलांची मासिकपाळी सुरु असताना त्यांना आपली अंडरपॅण्ट इतर कपड्यांबरोबर धुता येत नाही, असंही समिक्षा आणि राहुल यांनी सांगितलं. हा मुद्दा अनुपला पटला आणि त्याने हे सारं तुम्ही पहिल्यांदा पिच करतानाच सांगायला हवं होतं असं म्हटलं. त्यानंतर शार्क नमिता थापरने समिक्षा आणि राहुलच्या प्रोडक्टचं कौतुक करताना खरोखरच अशा डिटर्जंटची गरज असल्याचं म्हटलं. अंडरपॅण्ट्स जितक्या स्वच्छ हव्या तितक्या नसल्याने महिलांमध्ये योगीमार्गाच्या संसर्गाचं प्रमाण अधिक असतं, असंही नमिता म्हणाली.  "तुम्ही योग्य मुद्दा मांडून सांगितलं असतं तर गुंतवणुकदारांना तुम्ही अधिक छान पद्धतीने सांगू शकला असता आणि मुद्दा पटवून देऊ शकला असता," असं नमिता म्हणाली.

अखेर कितीला झाली डील?

समिक्षा आणि राहुल यांनी आपल्या 'युग्स' कंपनीचं मूल्य 20 कोटी असल्याचं सांगत 2.5 टक्क्यांसाठी 50 लाखांची मागणी केली होती. या वर्षभरात 4 कोटींची कमाई करण्याचं उद्देश असल्याचं दोघे म्हणाले. भविष्यात महिन्याला चार कोटी कमाई करण्याचा मानस दोघांनी बोलून दाखवला. शार्क पियुष बंन्सल यांनी समिक्षा आणि राहुलला लिंगरीज विकणाऱ्या ब्रॅण्डबरोबर टायअप करण्याची कल्पना सुचवलं. पियुष आणि रितेश अग्रवाल या दोघांनी या डिलमधून माघार घेतली. नमिता आणि अमन या दोघांनी एकत्रितपणे 50 लाख रुपयांचा निधी दिला. मात्र त्याच्या मोबदल्यात त्यांनी 6 टक्के वाटा मागितला. अखेर 4 टक्क्यांवर डील डन झाली.