Atlee Shelved Salman Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि दाक्षिणात्य लोकप्रिय दिग्दर्शक एटली या दोघांचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेलाय. शाहरुख आणि एटलीची टीम पाहिल्यानंतर सलमान खानच्या चाहत्यांना देखील त्याला अशाच प्रकारे अॅक्शन करताना पाहायचं होतं. त्यावेळी अशी बातमी समोर आली की एटली हा सलमान खानसोबत असाच एक अॅक्शनपट करणार आहे. पण आता या अॅक्शन ड्रामा चित्रपटाला घेऊन एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, या मेगा बजेट चित्रपटात रजनीकांत किंवा कमल हासन यांच्यापैकी कोणी एकासोबत तो स्क्रीन शेअर करताना दिसणार होता. पण आता याच प्रोजेक्टवर पूर्णविराम लावण्यात आला आहे.
शाहरुख खानचा सुपरहिट चित्रपट 'जवान'नंतर एटली आणि सलमान खानच्या जोडीला घेऊन चाहते खूप उत्साही झाले होते. हा चित्रपट पुनर्जन्माच्या कथेवर आधारित असल्याचे म्हटले जात होते. तर सलमान खान एका वेगळ्याचा अवतारात दिसणार असल्याचे सांगितले जात होते. पण रिपोर्ट्सनुसार, आता हा चित्रपट होणार नाही आहे. त्या मागचं कारण काय आहे अजून समोर आलेलं नाही. दरम्यान, चित्रपटाचा दिग्दर्शक एटलीनं देखील या प्रकरणात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तर त्यात असं म्हटलं जात आहे की एटलीचं लक्ष आता सलमान खान नाही तर अल्लू अर्जुनसोबत येणाऱ्या आगामी चित्रपटावर लावलं आहे. या आधी अशी माहिती समोर आली होती की अल्लू अर्जुन आणि एटलीमध्ये मानधनावर काही चर्चा सुरु होती.
हेही वाचा : लहानपणी खळखळून हसवणारा शाहिद कपूरचा 'चुप चुप के' ओरिजनल नाहीच, 'या' चित्रपटाची डिट्टो कॉपी!
शाहरुखला जवानमध्ये पाहिल्यानंतर अशाच दमदार अवतारात सलमानला पाहता येणार असल्याचं म्हटलं जात होतं. पण असं होणं सध्या कठीण आहे. आशा आहे की जबरदस्त अभिनेता-दिग्दर्शकाची जोडी ही स्क्रीनवर धम्माल करताना दिसतील. सलमान आणि एटली हे दोघं A6 या चित्रपटासाठी कोलॅब करणार होते. सगळ्यात आधी या चित्रपटात कमल हासनची एन्ट्री होणार असल्याची बातमी समोर आली होती. पण आता समजलं की सलमानसोबत रजनीकांत असणार आहे.