ना खलनायक, ना अॅक्शन, IMDb रेटिंग 8 असलेला ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेटपेक्षा 4 पट अधिक कमाई अन् 68 पुरस्कार

असा एक चित्रपट ज्यामध्ये ना अॅक्शन,ना भांडण, ना खलनायक. तरीही चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर. बॉक्स ऑफिसवर केली बजेटपेक्षा 4 पट अधिक कमाई. 

सोनेश्वर पाटील | Updated: Feb 11, 2025, 01:25 PM IST
ना खलनायक, ना अॅक्शन, IMDb रेटिंग 8 असलेला ब्लॉकबस्टर चित्रपट, बजेटपेक्षा 4 पट अधिक कमाई अन् 68 पुरस्कार title=

पूर्वी लोक असा विचार करायचे की कोणताही चित्रपट हिट होण्यासाठी त्यामध्ये अॅक्शन, खलनायक, गाणी आणि लढाई असली पाहिजे. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ही कल्पना बदलल्याच दिसत आहे. ज्यामध्ये लेखक आणि दिग्दर्शक हे अनोख्या आणि मनोरंजक कथांवर जास्त काम करताना दिसत आहेत. परंतु, असा एक चित्रपट होता, ज्यामध्ये कोणतीही अॅक्शन आणि लढाई नव्हती ना खलनायक देखील नव्हता. तरी देखील हा चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता.  

हा चित्रपट 2012 मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने प्रदर्शित होताच विक्रमी कमाई केली होती. या चित्रपटात दोन मोठ्या अभिनेत्री आणि एक मोठा अभिनेता होता. चित्रपटाची कथा इतकी रंजक होती की ती सर्वांना आवडली. इतकच नाही तर या चित्रपटाने राष्ट्रीय आणि फिल्मफेअर पुरस्कारांसह 68 पुरस्कार जिंकले आहेत.

2012 मध्ये प्रदर्शित झालेला 'बर्फी' चित्रपट

आम्ही तुम्हाला 2012 मध्ये रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा यांचा प्रदर्शित झालेल्या 'बर्फी' चित्रपटाबद्दल बोलत आहोत. हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला IMDb रेटिंग 8.1 इतकी आहे. चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना खूप प्रभावित केले. या चित्रपटात रणबीर कपूर आणि प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात इलियाना डिक्रूज सहाय्यक भूमिकेत होती. या चित्रपटाची कथा प्रेम आणि सुंदर मानवी नातेसंबंधांभोवती फिरते. या चित्रपटात रणबीरने एका मूक मुलाची भूमिका साकारली होती. संपूर्ण चित्रपटात त्याचा एकही संवाद नाहीये.

तर प्रियंका चोप्राने ऑटिज़्मने ग्रस्त असलेल्या मुलीची भूमिका साकारली होती. संवेदनशीलता, विनोद आणि निरागसता यांच्यात संतुलन साधणाऱ्या मुलीची भूमिका तिने उत्तम प्रकारे साकारली आहे. प्रियंकाने अनेक वेळा सांगितले होते की, ही भूमिका तिच्यासाठी खूपच आव्हानात्मक होती. परंतु त्यामुळे तिला खूप चांगला अनुभव मिळाला.

चित्रपटाचे बजेट आणि कमाई

'बर्फी' चित्रपटाचे बजेट हे फक्त 40 कोटी रुपये इतके होते. परंतु, या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चित्रपटाने जगभरात 175 कोटी रुपयांची कमाई केली. तर भारतात या चित्रपटाने 112 कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटाला एकूण 68 पुरस्कार मिळाले.