नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का?

Maharashtra Vidhan Sabha Election: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभेसाठी मतदान पार पडत आहे. पण हे नेते मात्र मतदानापासून वंचित राहणार

Updated: Nov 20, 2024, 09:34 AM IST
नाईलाज! स्वत:लाच मतदान करू शकणार नाहीत फडणवीस, ठाकरे; पण असं का? title=
Maharashtra Assembly polls these politician can cast vote for vidhan sabha election

Maharashtra Vidhan Sabha Election: आज महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. विधानसभेच्या 288 जागांसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळी सात वाजल्यांपासून नागरिकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या आहेत. राज्यात मतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. तर, सर्वसामान्य नागरिकांसह राजकीय नेतेही आज सकाळपासूनच मतदानासाठी केंद्रावर पोहोचले आहेत. मात्र राज्यातील असे काही नेते आहेत ते स्वतःसाठीचं मतदान करु शकणार नाहीत. 

राज्यभरात मतदान होत असताना अनेक मंत्र्यांसह बडे नेते स्वतःसाठीच मतदान करु शकणार नाहीत. उमेदवारी एका मतदारसंघात तर मतदान मात्र दुसऱ्या ठिकाणी असल्याने त्यांना स्वतःसाठी मतदान करता येणार नाही. 

हे नेते मतदानापासून वंचित राहणार 

नाव  उमेदवारी कुठे मतदान कुठे
देवेंद्र फडणवीस  नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर पश्चिम
विकास ठाकरे          नागपूर पश्चिम              नागपूर दक्षिण पश्चिम
बाळासाहेब थोरात      संगमनेर                 शिर्डी
आदित्य ठाकरे    वरळी       वांद्रे पूर्व
सुधीर मुनगंटीवार   बल्लारपूर   चंद्रपूर 
विजयकुमार गावित     नंदुरबार   नवापूर
आदिती तटकरे श्रीवर्धन   पेण
मिलिंद देवरा    वरळी मलबार हिल
रोहित पवार कर्जत जामखेड बारामती
नवाब मलिक  मानखुर्द, शिवाजीनगर कलिना
हीना गावित     अक्कलकुवा    नंदुरबार
ययाती नाईक  कारंज  पुसद
निलेश राणे     कुडाळ    कणकवली
धीरज देखमुख       लातूर ग्रामीण   लातूर शहर
झिशान बाबा सिद्दीकी   वांद्रे पूर्व वांद्रे पश्चिम
इम्तियाज जलील  औरंगाबाद पूर्व औरंगाबाद मध्य 
संतोष बांगर कळमनुरी हिंगोली
जितेंद्र मोघे आर्णी  दिग्रेस
अभिजित अडसूळ दर्यापूर  कांदिवली
मीनल खतगावकर लोहा  देगलूर
आशिष देखमुख   सावनेर  नागपूर पश्चिम
विजय अग्रवाल अकोला पश्चिम   अकोला पूर्व
सतीश चव्हाण  गंगापूर औरंगाबाद (पश्चिम)
गोपीचंद पडळकर  जत  खानापूर
अमल महाडिक  कोल्हापूर दक्षिण हातकणंगले
केदार दिघे  कोपरी पाचपाखाडी ओवळा माजिवडा
वैभव नाईक  कुडाळ कणकवली
विनोद शेलार  मालाड पश्चिम कांदिवली पूर्व
शायना एनसी  मुंबादेवी मलबार हिल
अशोक उईके  राळेगाव यवतमाळ
विजयकुमार देशमुख    सोलापूर शहर उत्तर सोलापूर शहर मध्य
 सुभाष देशमुख    सोलापूर दक्षिण सोलापूर शहर मध्य