महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागाणार; नाहीतर...

Maharashtra Politics : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी अमित शाहांवर केला आहे. 

वनिता कांबळे | Updated: Oct 20, 2024, 10:05 PM IST
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागाणार; नाहीतर...  title=

Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India Press Conference) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्यात. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून निकालाच्या पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणार आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केलाय... भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप राऊतांनी केलाय..

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालीये..महाराष्ट्रात एकाच टप्प्यात निवडणूक होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निवडणुकाचा निकाल आहे. मात्र निकालाच्या पुढील 48 तासात सरकार स्थापन करावे लागणाराय. मात्र, हा वेळ पुरेसा नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय..

निकालानंतरच्या 48 तासांत सरकार बनले नाही तर विधानसभेचा कालावधी संपणार आणि नवी विधानसभा अस्तित्वात आली नाही म्हणून राज्यात राष्ट्रपती शासन लावण्याची शिफारस राज्यपाल करतील. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं अमित शाह यांचं षडयंत्र आहे, असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलाय. 

अमित शाह हे महाराष्ट्राचे एक नंबरचे शत्रू असून एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे त्या महाराष्ट्रातल्या दुश्मनांचे हस्तक असल्याचा घणाघातही संजय राऊत यांनी केलाय. एकिकडे मविआकडून महायुतीवर मतदारयादीतील घोटाळ्यावरून आरोप सुरु आहे.. हे असतानाच संजय राऊत यांनी आता राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा कट असल्याचा आरोप केल्यानं राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे..