काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा...

Maharashtra Congress: महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 गँरटी जाहीर केल्या आहेत.

मानसी क्षीरसागर | Updated: Nov 6, 2024, 10:51 AM IST
काँग्रेस महाराष्ट्राच्या जनतेला 5 गँरटी देणार! शेतकरी, महिला आणि तरुणांसाठी काय? वाचा... title=
Maharashtra Assembly Election congress poll manifesto to focus on five guarantee in maharashtra

Maharashtra Congress: तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये यश मिळवून दिलेल्या योजनांचा आधार घेत महाराष्ट्र काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी प्लान आखला आहे. आज 6 नोव्हेंबर रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मुंबई इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभेत काँग्रेस आपल्या 5 गँरची जाहीर करणार आहेत. यावेळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेदेखील सभेत  राज्यातील जनतेला करणार संबोधित करणार आहेत.

काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी 25 लाख रुपयांची कर्जमाफी आणि 25 लाख रुपयांचा आरोग्य विमा जाहीर केला होता. कर्नाटकमध्ये गृह लक्ष्मी योजना आणली होती. महाराष्ट्रातदेखील तशाच पाच गँरटी राबवण्याची काँग्रेसची योजना आहे. यात 500 रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर, महिलांसाठी मोफत ST प्रवास, 50 हजार महिलांसाठी सरकारी नोकऱ्या, शेतकरी कर्जमाफी योजना, मोफत आरोग्य विमा 10 लाखापर्यंत करण्यात येणार, या पाच गॅरंटी जाहीर करण्यात येण्याची शक्यता. 

आज संध्याकाळी मुंबईतील BKC मैदानावर सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा (SP) शरद पवार, शिवसेना (UBT) उद्धव ठाकरे आणि इतर महत्त्वाचे नेते या सभेत राज्यातील जनतेला संबोधित करणार आहेत. 

नाना पटोलेंच्या 51 सभा 

काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या राज्यभरात एकूण 51 सभा पार पडणार आहेत. उद्यापासून नांदेड जिल्ह्यातून सभेला सुरुवात होणार आहे. मुंबईत कमी कमी सभा तर विदर्भात सर्वाधिक सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत 51 सभांचं आयोजन. आगामी दिवसात सभा वाढण्याची शक्यता.

पुण्यातील बंडखोरांना काँग्रेस पक्षाकडून नोटीस 

कसबा, शिवाजीनगर आणि पर्वती विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारांनी बंडाची तलवार म्यान करून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा जाहीर करावा. तसे न केल्यास निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय शहर काँग्रेसने घेतला आहे. तसा प्रस्ताव प्रदेश काँग्रेसलाही पाठविण्यात आला आहे. आबा बागुल, कमल व्यवहारे आणि मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे