Maharashtra 2024 Zeenia AI Exit Poll Vidarbha : झी न्यूजची आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँकर Zeenia लोकसभा निवडणुकीचा अचूक अंदाज व्यक्त केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार, विदर्भ असो किंवा मुंबई कोकण इथे कोण मुसंडी मारणार आहे, याचा अंदाच Zeenia AI Exit Poll मध्ये अंदाज वर्तविला आहे. Zeenia AI Exit Poll नुसार विदर्भात (Vidharbha assembly elections 2024) महायुतीची मुसंडी असल्याचं अंदाज व्यक्त केलाय.
विधानसभा निवडणूक 2019 मध्ये विदर्भातील निकालावर नजर पाहिलं तर भाजपला धक्का बसला होता. भाजपाच्या जागांमध्ये घट झाली होती. भाजपाला 18 जागांवर फटका बसला होता. विदर्भात 63 पैकी तब्बल 45 जागांवर भाजपानं 2014 मध्ये विजय मिळवला होता. मात्र यंदा विदर्भात भाजपाला 27 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. मात्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये भाजप मुसंडी मारणार आहे.
विदर्भ - 62
महायुती - 32-37
मविआ - 24-29
इतर - 00-02
Zeenia AI Exit Poll नुसार महायुतीला 32 ते 37 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर मविआला 24 ते 29 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. Zeenia AI Exit Poll च्या अंदाजानुसार लोकसभेतील पिछेहाटीनंतर महायुतीचं विदर्भात कमबॅक पाहिला मिळणार आहे. राज्यातील जनतेने कोणाला कौल दिला आहे, हे 23 नोव्हेंबर 2024 ला स्पष्ट होईल.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने झी न्यूजने पहिल्यांदाच Artificial Intelligence वापर करून एक्झिट पोल जारी केला होता. आणि Zee News AI Anchor Zeenia ने दिलेल्या एक्झिट पोलसमोर मोठे दिग्गज फेल ठरले होते.
यंदाचा एक्झिट पोल हा लोकांच्या समाजमाध्यमांवरच्य प्रतिक्रियांच्या आधारे तयार केला गेला आहे.
समाजमाध्यमांवरच्या 15 लाखांहून अधिक प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं आणि तोच सँपल साईज आहे.
महाराष्ट्रातून जवळपास 10 लाख प्रतिक्रियांचं विश्लेषण केलं.
इतका मोठा सँपल साइज एक्झिट पोलमध्ये कुणाचाच नसेल.
(महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)