Maharashtra Breaking News LIVE Updates: लाडक्या बहि‍णींची सरकारकडून फसवणूक, विजय वडेट्टीवार यांची टीका

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

Mansi kshirsagar | Feb 20, 2025, 20:21 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: लाडक्या बहि‍णींची सरकारकडून फसवणूक, विजय वडेट्टीवार यांची टीका

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

20 Feb 2025, 09:40 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: शेगावात गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा

शेगावात आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा. शेकडो भजनी दिंड्या शेगावी दाखल. भक्तिमय वातावरणात संतनगरी दुमदुमली

20 Feb 2025, 09:07 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात 12 जिल्ह्यांतील शेतक-यांचा एल्गार. विरोध डावलून सरकार महामार्गाचं काम करत असल्याचा आरोप

20 Feb 2025, 09:01 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर झाले, लवकरच धमाका होईल'

यवतमाळ वाशिम चे शिवसेना UBT चे खासदार संजय देशमुख यांनी पैशांचे आमिष व दबाव वाढवून शिवसेना खिळखिळी करण्याचा प्रयत्न होत असल्याचे वक्तव्य केल्यानंतर आगे आगे देखो, होता है क्या असे म्हणत पालकमंत्री संजय राठोड यांनी मिश्किल टिपणी केली आहे. ज्यांच्यावर ऑपरेशन टायगर झालेले आहे, ते आता रूम मध्ये आहे, सर्व आत्ताच सांगणार नाही, लवकरच ते बाहेर येतील तेव्हा मोठा धमाका असेल असे, सूचक वक्तव्य संजय राठोड यांनी केले आहे

20 Feb 2025, 08:21 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: ठाणे शहराला लोकसंख्येच्या मानाने पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा महापालिकेने केला. मात्र काही भागांना टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. तर वाढती लोकसंख्या, पाणीपुरवठा क्षमता लक्षात घेता, इतर 4 स्त्रोतांद्वारे 300 दक्षलक्ष लीटर  पाणीपुरवठा करण्याचं पालिकेचं लक्ष्य आहे.

20 Feb 2025, 08:18 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: 'राज्यात आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग होणार' 

केंद्राच्या धर्तीवर राज्यात आदिवासींसाठी स्वतंत्र आयोग करण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके केलीय. आदिवासी समाजापर्यंत त्यांच्या विकासाच्या योजना पोहोचवाव्यात यासाठी स्वतंत्र आयोग असणार असल्याची माहिती त्यांनी नागपुरात दिलीय. तसेच आगामी बजेटमधून आदिवासी विभागासाठी 10 टक्के बजेट वाढवून द्यावा अशी मागणीही त्यांनी नागपुरात केलीय. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी असलेले आदिवासी संग्रहालय नागपुरात सुरू होणार असल्याचं उईके म्हणालेत.

20 Feb 2025, 08:16 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: आमदार निवासासाठी आमदारांमध्ये खडाजंगी 

सार्वजिक बांधकाम विभागातील संबंधित अधिकाऱ्यांसमोर आमदारांमध्ये शाब्दिक चकमक. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानासोबतच आमदार निवासाचा तिढाही ऐरणीवर असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. महायुती सरकार स्थापन होऊन तीन महिने उलटले असतानाही अनेक निवनिर्माचित आमदार आमदार निवासाच्या प्रतीक्षेत  आहेत

20 Feb 2025, 08:15 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई विमानतळावर 5 कोटींचं कोकेन जप्त 

मुंबई विमानतळावर 5 कोटींचं कोकेन जप्त करण्यात आलंय. काँगोच्या एका महिलेला या प्रकरणी अटक करण्यात आलीये. या महिलेनं शरिरात हे कोकेन लववलं होतं.. तिच्या शरीरातून कोकेनच्या 34 कॅप्सूल काढण्यात आल्यात.. त्यांचं वजन 544 ग्रॅम असून त्याची बाजारातील किंमत ही 5 कोटींच्या घरात आहे.. आदिस अबाबा येथून मुंबईत येणा-या विमानाद्वारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती डीआरआयच्या अधिका-यांना मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी या विमानाबाहेर सापळा रचून ही कारावाई केली.

20 Feb 2025, 07:11 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यात GBSचा धोका वाढला?

दौंड  आणि नांदेडमध्ये आणखी दोघांचा GBSमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय GBSमुळे मृत्यूंची संख्या वाढतेय त्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.   जीबीएस आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत...राज्यात आतापर्यंत  २११ जणांना GBSची लागण झालीय.

20 Feb 2025, 07:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: रेखा गुप्ता आज घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. दुपारी साडेबारा वाजता होणार शपथविधी सोहळा.

 

20 Feb 2025, 07:08 वाजता

Maharashtra Breaking News LIVE Updates: शेगावात आज गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा