Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या
20 Feb 2025, 07:08 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौ-यावर
मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांचा आणखी दोन दिवस दिल्लीतच मुक्काम असेल. शिवाय दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आणि साहित्य संमेलनासाठी दिल्लीत जाणार असल्याची माहिती मिळतेय.
20 Feb 2025, 07:07 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगड जिल्हा भूकंपानं हादरला
पेण,सुधागड तालुक्यात भूकंपाचे धक्के. भूगर्भातून आलेल्या आवाजानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण
20 Feb 2025, 07:07 वाजता
Maharashtra Breaking News LIVE Updates: शरद पवारांविरोधात ठाकरे गटाने भूमिका घेतल्यानंतर पहिल्यांदाच संजय राऊत आणि शरद पवार आज एकाच मंचावर येणार. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला दोघांची उपस्थिती असणार. दोघे काय बोलतात याकडे लक्ष
- ‹ previous
- 1
- 2
- 3
- 4