Maharashtra Breaking News LIVE Updates: लाडक्या बहि‍णींची सरकारकडून फसवणूक, विजय वडेट्टीवार यांची टीका

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

Mansi kshirsagar | Feb 20, 2025, 20:21 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: लाडक्या बहि‍णींची सरकारकडून फसवणूक, विजय वडेट्टीवार यांची टीका

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

20 Feb 2025, 20:21 वाजता

धनंजय मुंडे 4 आठवड्यात ठीक होतील : अंजली दमानिया

 धनंजय मुंडे यांना Bell’s Palsy झाल्याचे कळले. कोणालाच कधी हा आजार होऊ नये. ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा. Bell’s Palsy हा एक nerve चा आजार आहे. हा कधी स्ट्रेसमुळे व कधी herpes ची साइड रिएक्शन म्हणून होतो. ते लवकर म्हणजे 4 आठवड्यात ठीक होतीलच.(हा माझा विषय आहे म्हणून मी म्हणत आहे). माझी लढाई त्यांच्या वृत्ती विरुद्ध आहे, त्यांच्या दहशती विरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध आहे. ती चालू राहीलच पण त्यांना तब्येतीसाठी शुभेच्छा.

20 Feb 2025, 19:10 वाजता

राज ठाकरेंची सर्व शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांसोबत बैठक सुरु

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सावरकर सभागृहात पक्षातील सर्व शाखाध्यक्ष आणि विभाग अध्यक्षांसोबत बैठक सुरु. बैठकीला संदीप देशपांडे, राजू पाटील, अविनाश जाधव, अविनाश अभ्यंकर, संतोष धुरी, यशवंत किल्लेदार नेते मंडळी उपस्थित. 

20 Feb 2025, 18:35 वाजता

प्रवीण दरेकरांचा SIT ला जबाब दिल्यानंतर उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप

मविआच्या काळात पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकण्याचे प्रयत्न केल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. ‘तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय षडयंत्र रचले जाऊ शकत नाही’ असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी प्रवीण दरेकरांवर केला आहे. याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली असून चौकशीला सुरुवात झालीय. 

20 Feb 2025, 17:56 वाजता

लाडक्या बहि‍णींची सरकारकडून फसवणूक, विजय वडेट्टीवार यांची टीका

गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीनुसार महायुतीचं सरकार लाडक्या बहिणींना फसवत आहे. अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. लाडक्या बहिणींना फसवण्याचं महापाप सरकारने केल्याची टीकाही त्यांनी केली.

20 Feb 2025, 17:36 वाजता

प्रदूषणकारी टायर कंपन्यांविरोधात गणेश नाईक आक्रमक

प्रदूषणकारी टायर कंपन्यांविरोधात गणेश नाईक आक्रमक झालेत. जनता दरबारादरम्यान नाईकांनी फोनवरून अधिका-यांना सुनावलय. नियमाचा भंग केल्यास कारखाने बंद करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. तसेच कारवाई करुन अहवाल सादर करण्याचेही आदेश गणेश नाईक यांनी दिलेत.  

20 Feb 2025, 16:43 वाजता

धनंजय मुंडेंनी मूळ बाबी बदलल्या, सुरेश धस यांचा आरोप

धनंजय मुंडे यांनी मूळ बाबी बदलून भ्रष्टाचार करण्यासाठी बैठक बोलावली होती. यामध्ये दिलीप झेंडे यांनी मुंडे यांना लालच दाखवून नॅनो युरिया, नॅनो डीएपी आणि कापूस साठवणूक बॅग खरेदीसाठी प्रस्ताव ठेवला. असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे. 

20 Feb 2025, 15:34 वाजता

कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये  चाकू हल्ला

कल्याण ते डोंबिवली दरम्यान धावत्या लोकल ट्रेनमध्ये  चाकू हल्ला. मुंबईत राहणारा  19 वर्षीय शेख जिया हुसेन  नावाच्या तरुणांनी खिशातला चाकू काढून  तीन प्रवाशांवरती हल्ला केला. अक्षय वाघ, हेमंत काकरिया , राजेश चांगलानी असे जखमी प्रवाशांची नावे आहेत.  कल्याणवरून दादरला जाणाऱ्या 9:47 जलद लोकलमध्ये  घडली घटना.  धक्का लागण्यावरून  प्रवाशांशी झालेल्या वादातून चाकू हल्ला केल्याची माहिती. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली आहे. 

20 Feb 2025, 15:01 वाजता

 माणिकराव कोकाटे आणि  विजय कोकाटे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल

नाशिक जिल्हा कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी माणिकराव कोकाटे आणि बंधू विजय कोकाटे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल. अर्जावर सुनावणी सुरू. थोड्याच वेळात जमिनाबाबत होणार निर्णय. काही वेळा पूर्वीच कोकाटे आणि त्यांच्या बंधूंना शिक्षा सुनावण्यात आली आहे. अपिलासाठी एक महिना दिला असल्याने कोकाटे उच्च न्यायालयात अपील करण्याची शक्यता. 

20 Feb 2025, 14:09 वाजता

विधीमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ

विधीमंडळ समित्यांकडे सर्वच राजकीय पक्षांची पाठ. समित्यांसाठी पात्र नावे पाठवण्यास सत्ताधारी व विरोधी पक्ष उदासीन. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनीही व्यक्त केली नाराजी. तात्काळ नावे पाठवा, नाहीतर आपल्या अधिकार कक्षेत नियुक्ती करण्याचा दिला इशारा. विधीमंडळ सचिवालयाने नियुक्तीस नावे देण्यासाठी पाठवले पत्र. विधीमंडळ कामकाजासाठी विविध 29 समित्या कार्यरत. सत्ताधारी पक्षाचे तब्बल 237 तर विरोधी पक्षाचे 51 सदस्यांना मिळणार संधी. 

20 Feb 2025, 13:49 वाजता

12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानवर धडकणार

12 मार्चला 12 जिल्ह्यातील शेतकरी आझाद मैदानवर धडकणार. शक्तीपीठ विरोधी परिषदेमध्ये हा निर्णय झाला आहे. कोल्हापूरमध्ये आज बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्ग संदर्भात परिषद पार पडली. 12 मार्च रोजी आझाद मैदानावर बारा जिल्ह्यातील शेतकरी धडकणार आहेत.