Maharashtra Breaking News LIVE Updates: एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के एसटी बस भंगार, परिवहन मंत्र्यांची माहिती

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यासहीत देश आणि परदेशातील प्रमुख घडामोडींचा धावता आढावा जाणून घ्या एकाच ठिकाणी...

Feb 19, 2025, 21:22 PM IST
Maharashtra Breaking News LIVE Updates: एसटी महामंडळाच्या ताफ्यातील साठ टक्के एसटी बस भंगार, परिवहन मंत्र्यांची माहिती

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रसहीत देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. याबरोबरच राजकीय, प्रशासकीय घडामोडींसंदर्भातील सर्वच अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी....

19 Feb 2025, 11:17 वाजता

शिवरायांना अभिप्रेत असणारं राज्य पुन्हा एकदा यावं - वैभव नाईक

शिवजयंतीनिमित्ताने मालवणमधील सिंधुदुर्ग किल्यावर माजी आमदार वैभव नाईक हे शेकडो शिवभक्तांसह शिवराजेश्वर मंदिरात जिरे टोप व पुष्पहार अर्पण करीत नतमस्तक झाले.यावेळी त्यांनी राज्यातील शिवप्रेमीना शुभेच्छा दिल्या छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणारं राज्य पुन्हा एकदा राज्यात यावं, अशी प्रार्थना माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवराजेश्वर मंदिरात केली.

19 Feb 2025, 10:00 वाजता

शिवजयंतीनिमित्त बॅनरबाजीवर खर्च करण्याऐवजी धुळेकरांना मोफत दाखवला 'छावा' चित्रपट

धुळ्यात शिवजयंती निमित्त सिनेमा थिएटरपर्यंत मिरवणूक काढत दर्शकांनी 'छावा' चित्रपट बघितला. शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्याकडून दर्शकांना छावा हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. शिवजयंतीनिमित्त बॅनरबाजीवर वायफळ खर्च न करता आपण संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असलेला छावा हा चित्रपट दर्शकांना दाखवण्याचा निर्णय घेतल्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांनी यावेळी सांगितले. सिनेमा थिएटरपर्यंत काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने धुळेकरांचे लक्ष वेधून घेतले होते. तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातून आदर्श मिळावा, या आदर्शातून त्यांनी आपलं जीवन घडवाव या उद्देशाने हा उपक्रम राबवला गेला, असंही महाले म्हणाले.

19 Feb 2025, 09:57 वाजता

आग्र्यातील किल्ल्यावर साजरी होणार शिवजयंती; फडणवीस, शिंदे आणि योगींबरोबरच विकीचीही हजेरी

राज्यभरात आज शिवजयंतीचा उत्साह आहे. महाराष्ट्राबाहेर आग्रामध्ये सुद्धा शिवजयंती उत्साहात साजरी केली जाणार आहे. आग्र्याच्या किल्ल्यात हा सोहळा रंगणार आहे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची हजेरी असणार आहे. 'छावा' चित्रपटात संभाजीराजेंची भूमिका साकारणारा विकी कौशलसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. आग्र्याच्या या किल्ल्यात शिवाजीराजांना औरंगजेबाने जेरबंद करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शिवाजी राजे येथून यशस्वीपणे निघाले होते या इतिहासाच्या साक्षीनं ही शिवजयंती साजरी केली जाणार आहे. या शिवजयंतीची जोरदार तयारी सुरू आहे.

19 Feb 2025, 09:06 वाजता

आसनगावजवळ लोकल ट्रेनमधून पडून तरुणीचा मृत्यू; ओळख पटेना, पोलिसांनी केलं मदतीचं आवाहन

आसनगांव-वासिंद दरम्यान वेहलोली जवळील फाटकाजवळ लोकलमधून एक अज्ञात तरुणी काल सहा ते सातच्या दरम्यान पडली.‌ तेथील गेटमन व उपस्थित लोकांनी सदर तरुणीला प्रथम आसनगाव येथील क्रिस्टल केअर हाँस्पिटल व नंतर उपजिल्हा रूग्णालय शहापूर येथे उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारा पूर्वीच ती मृत‌ झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी‌ दिली.‌ सदर‌ तरूणीचं शव सध्या उपजिल्हा रूग्णालय शहापूर येथे ठेवण्यात आलं आहे. सदर तरुणीची अद्याप ओळख पटली नसून नातेवाईकांनी 8055151565 या नंबरवर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

19 Feb 2025, 08:56 वाजता

'शिवरायांनी अनेक पिढ्यांना...'; PM मोदींनी दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवजयंतीनिमित्त केली आहे. "शिवरायांच्या शौर्याने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याचा पाया घातला आणि अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्यासाठी प्रेरणा दिली. एक मजबूत, स्वावलंबी आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी ते आपल्याला प्रेरणा देतात," असं पंतप्रधान मोदींनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवरुन म्हटलं आहे.

19 Feb 2025, 08:33 वाजता

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसहीत शिवनेरीवर पोहोचले

शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल झाले आहेत.

19 Feb 2025, 08:02 वाजता

कमाल खानवर कठोर कारवाई करा; ज्योती मेटेंची मागणी

छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कमाल खान, विकिपिडिया वर कारवाई करण्याची मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.

19 Feb 2025, 07:17 वाजता

शिवजयंतीनिमित्त विकी कौशल आज रायगडावर जाणार

शिवजयंतीचे औचित्य साधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह कार्यक्रमाची सुरुवात किल्ले रायगडावरून होत आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ घालणाऱ्या 'छावा' चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशल या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे किल्ले रायगड स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवला जाणार आहे.

19 Feb 2025, 06:49 वाजता

शिवनेरीवर आज शिवजनमोत्सव सोहळा; मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज 395 वी शिवजयंती साजरी होत असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सकाळी 8 वाजता किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे. यापूर्वी सकाळी 7 वाजता पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा होऊन पालखी शिवजन्मस्थळाकडे प्रस्थान करेल. शिवजयंतीनिमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत.

19 Feb 2025, 06:44 वाजता

जितेंद्र आव्हाडांना मोठा धक्का! दोन महत्त्वाचे शिलेदार राष्ट्रवादीत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अभिजीत पवार व हेमंत वाणी यांनी पक्ष प्रवेश केला. काँग्रेसचे चंद्रकांत दायम यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.  ठाणे आणि मुंब्रातील अनेक युवकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.