Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रसहीत देशभरामध्ये आज मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली जात आहे. याबरोबरच राजकीय, प्रशासकीय घडामोडींसंदर्भातील सर्वच अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी....
19 Feb 2025, 06:41 वाजता
घाटकोपरमधून 9 बांगलादेशींना अटक
पोलीस परिमंडळ 7 च्या विशेष पथकाने पथक प्रमुख पोलीस निरीक्षक रेवणसिद्ध ठेंगळे यांच्या नेतृत्वात धडक कारवाई करीत भारतात घुसखोरी केलेल्या तब्बल 9 बांगलादेशींना गजाआड केले आहे.हे बांगलादेशी चेंबूर, नवी मुंबई परिसरात गेले तीस ते चाळीस वर्षापासून अनधिकृतपणे राहत होते. यात चार महिला , चार पुरुषांसह एक चार वर्षाचा बालकाचा समावेश आहे. या अगोदर या पथकाने 25 बांगलादेशी गजाआड केले होते, त्यांच्याकडे चौकशी केल्यावर या दोन बांगलादेशी कुटुंबाची माहिती या पथकाला मिळाली.या माहितीच्या आधारे तांत्रिक तपास करीत या पथकाने ही कारवाई केली आहे. दोन महिन्यात 13 कारवाया करीत पोलिसांनी 45 बांगलादेशी ताब्यात घेऊन कारवाई केली असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त विजयकांत सागर यांनी दिली आहे.
19 Feb 2025, 06:34 वाजता
अजिंक्यतारा किल्ल्यावर मशाल महोत्सव
साताऱ्यात शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अजिंक्यतारा किल्ला शेकडो मशालींनी उजळून निघाला आहे. शिवजयंती महोत्सवाचा माध्यमातून हा महोत्सव अनेक वर्षांपासून घेतला जातो आहे. हा मशाल महोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने शिव भक्त अजिंक्यतारा किल्ल्यावर आले होते. मान्यवरांच्या हस्ते गड पूजन करून या मशाल महोत्सवाला सुरुवात केली जाते.