Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रामधील निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर घडामोडींचे लाइव्ह अपेड्स आपण या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच

Breaking News LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील संभ्रम कायम असून राजकीय घडामोडींना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबरोबर मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार यासंदर्भात उत्सुकता कायम आहे. राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.

26 Nov 2024, 07:02 वाजता

शरद पवारांच्या पराभूत उमेदवारांची आज बैठक

शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीनंतर पक्षाच्या पराभूत उमेदवारांची बैठक शरद पवार यांच्या उपस्थिती आज सकाळी 11 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडणार आहे.

26 Nov 2024, 07:02 वाजता

सप्तश्रृंगगड घाट रस्ता आजपासून 9 जानेवरीपर्यंत बंद

सप्तश्रृंगगड घाट रस्ता आजपासून 9 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहे. सोमवार, बुधवार व गुरुवारी सकाळी 6 ते दुपारी 11.30 या काळात रस्ता बंद राहणार आहे.

26 Nov 2024, 06:25 वाजता

रश्मी शुक्ला पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालक

संजय कुमार वर्मा यांच्याकडून तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गृह विभागाकडून हे आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांचा पदभार काढून संजीव कुमार वर्मा यांच्याकडे सोपवला होता. निवडणूक संपताच रश्मी शुक्ला यांच्या सक्तीच्या रजेचा कार्यकाळ संपला आहे. रश्मी शुक्ला यांनी  पुन्हा पदभार स्वीकारावा असा आदेश गृह विभागाने काढला आहे.

26 Nov 2024, 06:25 वाजता

आज ठाकरेंच्या पराभूत उमेदवार 'मातोश्री'वर

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पराभूत उमेदवारांची 'मातोश्री'वर आज बैठक होणार आहे. ही बैठक दुपारी 12.30 वाजता होणार आहे.