Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रामधील निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर घडामोडींचे लाइव्ह अपेड्स आपण या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच

Breaking News LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील संभ्रम कायम असून राजकीय घडामोडींना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबरोबर मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार यासंदर्भात उत्सुकता कायम आहे. राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.

26 Nov 2024, 21:54 वाजता

शिरसाठ आणि फडणवीस यांच्यात खलबत 

सागर बंगल्यावर मागील एक तासापासून संजय शिरसाठ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात  खलबत सुरु आहेत.एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून त्यांच्या आमदारांकडून लॉबिंग सुरू आहे. या संपूर्ण प्रयत्नांमध्ये शिंदेंचे आमदार यशस्वी होता की नाही हे देखील पाहणं महत्वाचे आहे.

26 Nov 2024, 21:09 वाजता

एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी श्रीरामपुरात महाआरती

राज्याला विकासाची दिशा देऊन लाडक्या बहिणींसह शेतकरी, युवक त्याच बरोबर सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ऐतिहासिक निर्णय घेणारे एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील जागृत हनुमान मंदिरात शिवसेनेच्या वतीने महाआरती करत शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी हनुमानाला साकडे घातलय.

26 Nov 2024, 20:32 वाजता

इंदोर राष्ट्रीय महामार्गावर 4 तासापासून चक्काजाम 

उत्तर भारत व दक्षिण भारत या विभागाला जोडणारा प्रमुख राष्ट्रीय मार्ग असलेला पुणे इंदोर महामार्ग हा येवला शहरातून जात असून या महामार्गावर अनेक दिवसांपासून वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे त्यात संभाजीनगर मालेगाव या दोन शहरांना जोडणारा कन्नड घाट कामानिमित्त बंद असल्यामुळे सर्व वाहतूक येवला मार्गे सुरु असून प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे वाहतूक कोंडीची ड्रोन फुटेज घेतली आहे. 

26 Nov 2024, 19:55 वाजता

निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच  

रविवारी अंबरनाथ विधानसभेची मतमोजणी इथल्या महात्मा गांधी विद्यालयात पार पडली. यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. संपूर्ण दिवसभर मतमोजणी सुरू असल्यानं कर्मचाऱ्यांच्या चहा-नाश्त्याची तसच जेवणाची व्यवस्थाही इथंच करण्यात आली होती. खाल्ल्यानंतर या कर्मचाऱ्यांनी उष्टी ग्लासं, पत्रावळ्या, शिळं अन्न शाळेच्या आवारातच फेकून दिलं. मतमोजणी झाल्यानंतर पालिकेमार्फत या कचऱ्याची तत्काळ सफाई होणं गरजेचं होतं. मात्र हा कचरा 3 दिवस तसाच राहिल्यानं आता याठिकाणी दुर्गंधी पसरू लागली आहे. याचा शाळेतल्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागलाय. जिकडे-तिकडे कचराच असल्यानं आम्ही खेळायचं कुठे? असा सवालही विद्यार्थी करू लागले आहेत.

26 Nov 2024, 19:31 वाजता

कल्याणच्या व्हर्टेक्स या नामांकित बहुमजली इमारतीमध्ये भीषण आग

कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात असलेल्या व्हर्टेक्स या नामांकित बहुमजली इमारतीमध्ये आज सायंकाळी भीषण आग लागली आहे. या गृहसंकुलातील 14 व्या मजल्यावर आग लागली असून त्यावरील 15 आणि 16 व्या मजल्यावर काही नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना अग्निशमन दल, पोलिस आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र आगीचा रुद्रावतार पाहता अनेक अडचणी येत असल्याचे प्रत्यक्षदर्शिकडून सांगण्यात आले.

26 Nov 2024, 18:27 वाजता

शिवेंद्रराजें भोसले यांना मंत्रीपद मिळावे यासाठी उदयनराजे भोसले सरसावले

शिवेंद्रराजें भोसले यांना मंत्रीपद मिळावे यासाठी खा. उदयनराजे भोसले सरसावले आहेत.चार आमदारांसह खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.कोरेगावचे आ. महेश शिंदे, कराड उत्तरचे आ.मनोज घोरपडे, कराड दक्षिणचे आ.अतुल भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह खा. उदयनराजे भोसले यांनी ही भेट घेतली आहे.शिवेंद्रराजेंना मंत्री करा, मी स्वतः सातारा जिल्ह्यात आणखी भाजप वाढविण्यासाठी प्रयत्न करतो असा शब्द खा. उदयनराजे भोसले यांनी देवेंद्र फडणीस यांना दिला असल्याची माहिती आहे.

26 Nov 2024, 18:21 वाजता

मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप महाराष्ट्रात पर्यवेक्षक पाठवणार

राज्यात भाजपच्या नेतृत्वातील महायुतीला बहुमत मिळाल्याच्या तीन दिवसांनंतरही मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित झालेले नाही. त्यातच 27 तारखेला मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. परंतु, आताच हाती आलेल्या माहितीनुसार, यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.मुख्यमंत्री ठरवण्यासाठी भाजप महाराष्ट्रात पर्यवेक्षक पाठवणार आहे. हे पर्यवेक्षक आमदारांशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील.

26 Nov 2024, 18:20 वाजता

बहुमत असताना एवढं का वेळ लागतोय?- सुप्रिया सुळे 

मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाही यात काही आश्चर्य वाटत नाही.एवढ मोठ बहुमत असताना एवढं का वेळ लागतोय हे आश्चर्य कारक आहे. शिंदे यांना शब्द दिलं होता की नाही हे त्यांनाच माहीत. हे 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाबत देखील असाच झाल होतं. उद्धव ठाकरे 2019 ला वारंवार हेच बोलत होते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, त्याचाच हा करिश्मा होता ना? शिंदे यांना फसवल की नाही हे त्यांनाच विचारल पाहिजे. शिंदे यांचा चेहरा होता त्यामुळं यश मिळाला हे नाकारता येत नाही. सगळ्यांनी एकत्र येऊन EVM बाबत देता एकत्र करून सरकारकडे जायला हवं, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

26 Nov 2024, 17:35 वाजता

पेपरद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली 

निवडणुकीत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याबाबतची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. चंद्राबाबू नायडू किंवा रेड्डी जेव्हा हरतात तेव्हा ते म्हणतात की ईव्हीएममध्ये छेडछाड झाली आहे, पण जिंकल्यावर ते काहीच बोलत नाहीत. यानंतर सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळत असल्याचे सांगितले. न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनी यासंदर्भात निर्णय दिलाय.

26 Nov 2024, 17:33 वाजता

शरद पवार गटाकडून पक्ष, चिन्हाप्रकरणी नवे प्रतिज्ञापत्र दाखल 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह प्रकरणात नवी घडामोड घडली आहे. शरद पवार गटाकडून नवे प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहे.   अजित पवार गटाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन केले तसेच शरद पवारांचा फोटोही वापरल्याचे शरद पवार गटाचे म्हणणे आहे.  यासंबंधीचे पुरावे दाखल करण्यासाठी वेळ मागणार, आज वेळ मागणार होते मात्र प्रकरण सुनावणीपर्यंत पोहोचले नाही.उद्या पुन्हा या प्रकरणी सुनावणीची शक्यता आहे.