Breaking News LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील संभ्रम कायम असून राजकीय घडामोडींना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबरोबर मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार यासंदर्भात उत्सुकता कायम आहे. राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.
26 Nov 2024, 10:49 वाजता
अजित पवार राजभवानात दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनात दाखल झाले आहेत.
26 Nov 2024, 09:41 वाजता
मिशन विधानसभेच्या यशानंतर महाराष्ट्र भाजपा पुढच्या चॅलेंजासाठी तयार; आज महत्त्वाची बैठक
भाजपच्या मोर्चा आणि प्रकोष्ठ प्रमुखांची आज प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आढावा घेणार आहेत. महिला मोर्चा, युवा मोर्चा, किसान मोर्चासह उद्योग आघाडी प्रकोष्टचे संयोजक उपस्थित राहणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून तयारी सुरू झाली आहे. दुपारी 12 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात बैठकीचं आयोजन
26 Nov 2024, 09:38 वाजता
पुण्यातील सरकारी कार्यालयांमध्ये हेल्मेटसक्ती; पोलिसांकडून 168 जणांवर कारवाई
पुण्यातील सरकारी कार्यालय बाहेर आरटीओची हेल्मेट कारवाई तीव्र हेल्मेटसक्ती नंतर आरटीओकडून कडक तपासणी. 20 ऑक्टोबर पासून 680 वाहनाची आरटीओकडून तपासणी करण्यात आली आहे. 168 जणांवर हेल्मेट न घातल्याने आरटीओकडून कारवाई केली गेली आहे. सरकारी कार्यालयामध्ये हेल्मेटसक्ती केल्यानंतर आरटीओकडून कार्यालयाबाहेर सरकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
26 Nov 2024, 09:10 वाजता
पोर्शे कार अपघात प्रकरण: सरकारकडून नवीन अर्ज
पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोप निश्चित करून खटला चालवावा यासाठी विशेष सरकारी वकिलांनी अर्ज केला आहे. अल्पवयीन कारचालकावर कायदेशीर कारवाई करताना मुलांचे रक्ताचे नमुने बदलून पुरावा नष्ट केल्याच्या प्रकरणात आरोप निश्चित करा अशी मागणी करण्यात आली आहे. नऊ आरोपींविरुद्ध आरोप निश्चित करून खटला चालवण्यासाठी विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयात धाव घेतली आहे. आरोपीच्या विरोधात आरोप निश्चित करून टाईम बॉण्ड प्रोग्राम निश्चित करा अर्जात नमूद करण्यात आलेला आहे. या प्रकरणात व्यावसायिक विशाल अग्रवाल , शिवानी अग्रवाल डॉक्टर अजय तावरे श्रीहरी हरनोळ, अतुल घटकांबळे, अशपाक मकानदार ,अमर गायकवाड, आदित्य अविनाश चौधरी, यांच्यावर खटला सुरू करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे.
26 Nov 2024, 09:09 वाजता
भाडे नाकारणाऱ्या मुंबईतील 4252 रिक्षा, टॅक्सी चालकांविरोधात RTO ची कारवाई
मुंबईतील विविध भागात गेल्या काही महिन्यांत भाडे नाकारणाऱ्या आणि जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर राज्य परिवहन विभागाने कारवाई केली आहे. मुंबई आणि उपनगरांतील आरटीओ कार्यालयामार्फत गेल्या काही महिन्यांमध्ये 4252 रिक्षा आणि टॅक्सीचालकांवर कारवाई करण्यात आली.
26 Nov 2024, 09:05 वाजता
26/11 हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण : मुंबईत अभिवादन संचलन कार्यक्रमाचे आयोजन; CM, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 16 वर्ष पुर्ण होत आहेत. मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांना मानवंदना देण्यासाठी मुंबई पोलिसांच्या मुख्यालयात "अभिवादन संचलन कार्यक्रम" आयोजित करण्यात आला आहे. शहीद अधिकारी आणि कर्मच्यारी यांचे कुटुंबीय,माजी पोलिस अधिकारी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमला उपस्थित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शहीदांबरोबरच मृत्यांना अभिवादन करण्यासाठी आलेत. पोलिस महासंचालक रश्मी शुक्लाही शहीद अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित आहेत.
26 Nov 2024, 08:18 वाजता
मुंबई विमानतळावर 2.71 कोटींचे सोने हस्तगत
दुबईतून मुंबईमार्गे मालेला जाणाऱ्या एका प्रवाशाला आणि विमानतळावरील एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला सीमा शुल्क विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिटने सोने तस्करीप्रकरणी अटक केली आहे. त्यांच्याकडे तीन किलो 900 ग्रॅम सोने होते. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत दोन कोटी 71 लाख रुपये आहे. दुबईतून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यामुळे सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. तो माले येथे जाणार होता. त्यामुळे तो विमानतळाच्या ट्रान्झिट परिसरात होता. या दरम्यान त्याने त्याच्याकडील एक बॉक्स त्या परिसरात काम करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याला दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही थांबविले आणि त्या बॉक्सची तपासणी केली असा त्यात सोन्याचे 12 गोठवलेले बार आढळून आले. ते त्यांच्याकडे कसे आले याचे उत्तर दोघांनाही देता आले नाही.
26 Nov 2024, 08:15 वाजता
कल्याण-डोंबिवलीत आज पाणीपुरवठा पूर्णपणे बंद
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नेतिवली जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत व यांत्रिक उपकरणांची दुरूस्ती आणि वाहिनीवरील गळती थांबवणे व व्हॉल्व्हची दुरूस्त करण्याकरीता मंगळवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे. डोंबिवली पूर्व व पश्चिम परिसरास होणार संपूर्ण पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तरी, सदर परीसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिकलेच्यावतीने करण्यात आले आहे.
26 Nov 2024, 08:05 वाजता
कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे कामकाज अंतिम टप्प्यात; शरद पवार, प्रकाश आंबेडकरांचीही झालेली चौकशी
कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाचे कामकाज अंतिम टप्प्यात आले आहे. विशेष सरकारी वकिलांकडून आज 500 पानांचा अंतिम लेखी युक्तिवाद सादर केला जाणार आहे. आयोगाचे कामकाज 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर याबाबतचा अहवाल सादर केला जाणार आहे. कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी आयोजित कार्यक्रमानंतर दोन गटांत हिंसाचार झाला होता. त्यावर राज्य सरकारने 9 फेब्रुवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा चौकशी आयोगाची स्थापना केली होती. पुणे पोलीस दलातील अधिकारी, ग्रामीण पोलीस, माजी जिल्हाधिकारी सौरभ राव, ज्येष्ठ नेते शरद पवार, प्रकाश आंबेडकर, कोरेगाव भीमा आणि वढू बुद्रुकचे ग्रामस्थ, कार्यकर्त्या हर्षाली पोतदार यांच्यासह 53 साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या
26 Nov 2024, 07:21 वाजता
डॉलरच्या तुलनेत रुपयात दहा पैशांनी वाढ
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत सोमवारी दहा पैशांनी वधारून 84.31 वर बंद झाला. आंतरबँक परकी चलन बाजारात रुपया 84.38 वर उघडला आणि ग्रीनबॅकच्या तुलनेत दिवसभरात त्याने 84.25 चा उच्चांक गाठला. दिवसअखेर रुपया डॉलरच्या तुलनेत शुक्रवारच्या (21 नोव्हेंबर रोजी) 84.41 वरून दहा पैशांची वधारून 84.31 वर बंद झाला. शुक्रवारी, रुपया त्याच्या सार्वकालिक नीचांकी स्तरावरून सावरला होता आणि डॉलरच्या तुलनेत नऊ पैशांनी वाढून 84.41 वर बंद झाला होता. अमेरिकेत रोख्यांच्या उत्पन्नातील वाढ, भू- राजकीय तणाव काही प्रमाणात कमी होण्याची चिन्हे आहेत. इस्राईल- हिजबुल्लाह युद्धविराम करार होण्याची शक्यता, रशिया-युक्रेन युद्धातही आलेली शिथिलता यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होत आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.