Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रामधील निवडणुकीनंतर राजकीय घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत असून राज्याच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात लवकरच निर्णय अपेक्षित आहे. दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय तसेच इतर घडामोडींचे लाइव्ह अपेड्स आपण या ठिकाणी पाहू शकता...

Maharashtra Breaking News LIVE Updates: निवडणूक कर्मचाऱ्यांकडून अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयात कचरा, 3 दिवस तसाच

Breaking News LIVE Updates: राज्याचे मुख्यमंत्री कोण होणार यासंदर्भातील संभ्रम कायम असून राजकीय घडामोडींना अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत वेग आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबरोबर मंत्रिमंडळामध्ये कोणाची वर्णी लागणार यासंदर्भात उत्सुकता कायम आहे. राजकीय घडामोडींबरोबरच राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.

26 Nov 2024, 17:29 वाजता

शिंदेंना केंद्रात मंत्री करावं, फडणवीसांना मुख्यमंत्री बनवावं- आठवलेंचा सल्ला  

एकनाथ शिंदेंना केंद्रात मंत्री करावं. राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला आहे. जनतेनं आम्हाला कौल दिला आहे.लोकसभेच्या निवडणूकीत ज्यांना जागा मिळाल्या तेच आता विधानसभेत ईव्हीएमच्या नावानं ओरडत आहेत.
बीजेपीला जास्त जागा मिळाल्या त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री असावा.एकनाथ शिंदेंबाबत आदर आहे परंतु कौल आम्हाला दिलाय, असे ते म्हणाले.

26 Nov 2024, 15:43 वाजता

मविआ एकत्र येऊन ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन करण्याची शक्यता 

ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारण्या संदर्भात उद्धव ठाकरे यांचे आजच्या बैठकीत सुतोवाच केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी एकत्रित येऊन ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याची शक्यता आहे. पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीन आणि मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या गोंधळा संदर्भात पाढा वाचल्यानंतर उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतील इतर नेत्यांशी बोलून ईव्हीएम मशीन घोटाळा विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

26 Nov 2024, 14:53 वाजता

देवळी पेंढरीजवळ ट्रॅव्हल्स पलटी; एका विद्यार्थाचा मृत्यू

नागपूर आणि वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या देवळी पेंढरी या गावानजीक असलेल्या घाटामध्ये ज्युनिअर महाविद्यालयाचे विद्यार्थी घेऊन वर्ध्यातून परत नागपूरला जात असलेल्या ट्रॅव्हल्सला अपघात झालाय. जंगल घाटामध्ये ट्रॅव्हल्स पलटी झाली असल्याची माहिती आहे. यात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाले आहे. ट्रॅव्हल्समध्ये 52 विद्यार्थी प्रवास करीत होते..जखमी विद्यार्थ्यांना ऐम्स हॉस्पिटल मध्ये भरती केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..हे सगळे विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिर शाळेचे असल्याची माहिती समोर येते आहे.

26 Nov 2024, 14:39 वाजता

बाजार समितीत भाजीपाला चोरीवरून व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला

शेतमालाची चोरी करण्यास विरोध केल्याचा राग मनात धरून नारायणगाव बाजार समिती मध्ये एका तरुणाने व्यापा-यावर कोयत्याने प्राण घातक हल्ला केलाय.यात व्यापारी गणेश एरंडे जबर जखमी झालेत.व्यापारी गणेश एरंडे यांच्यावर खेड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या तरुणावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव रुपेश कवडे, संचालिका प्रियंका शेळके,माउली खंडागळे यांनी निवेदनाद्वारे नारायणगाव पोलिसात केली आहे.मात्र घटनेला 3 दिवस होऊनही पोलिसांनी मात्र आरोपीला अटक केली नाहीये.बाजार समितीच्या संचालिका प्रियांका शेळके यांनी याबाबत नारायणगाव पोलिसांत निवेदन देऊन थेट पोलिस स्टेशन मधून केलेलं फेसबुक लाईव्ह मूळे ही घटना तालुक्यात वाऱ्यासारखी परसलीये.

26 Nov 2024, 13:53 वाजता

शरद पवारांचा नवनिर्वाचित आमदार उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी 'मातोश्री'वर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे विजयी उमेदवार संदिप क्षीरसागर 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहोचले. विजयी झाल्यानंतर आभार मानण्यासाठी संदिप क्षीरसागर उद्धव ठाकरेंच्या भेटीला आल्याचे समजते.

26 Nov 2024, 13:09 वाजता

कोंडबाईबारी घाटात चार ट्रक अन् बसचा विचित्र अपघात; एकाचा मृत्यू

नंदुरबारमधील नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. चार ट्रक आणि बसच्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 15 प्रवासी जखमी झाले आहेत. अमळनेर-सुरत बस आणि चार ट्रकांचा अपघात झाला. महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने उपाययोजना होत नसल्याने वाहन चालकांमध्ये नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे.

26 Nov 2024, 12:31 वाजता

अजित पवारांनी घड्याळ चिन्ह वापरुन...; शरद पवारांच्या पक्षाचा SC मध्ये दावा

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आलं आहे. अजित पवार यांनी घड्याळ चिन्ह वापरून मतदारांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा दावा शरद पवाराच्या गटाने केला आहे. घड्याळ चिन्हासोबत जोडल्या गेलेल्या भावना आणि त्याबाबतचा लाभ घेण्याचाही प्रयत्न केला, असंही शरद पवार गटाने म्हटलं आहे. याबाबतचे पुरावे म्हणून काही कागदपत्रं दाखल करण्याची परवानगी द्या, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केली आहे. 

26 Nov 2024, 11:36 वाजता

शिंदेंनी मुख्यमंत्री पद सोडल्यानंतर राज्यपालांनी त्यांच्यावर सोपवली नवी जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या पदाचा राजीनामा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन् यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर राज्यपालांनी त्यांच्याकडेच पुढील मुख्यमंत्री निवडेपर्यंत आणि सरकारचा कारभार सुरु होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याची जबाबदारी सोपवली आहे. 

26 Nov 2024, 10:56 वाजता

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात दाखल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'वर्षा' बंगल्यावरुन राजभवनात पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आधीच राजभवनामध्ये पोहोचले आहेत. 

26 Nov 2024, 10:51 वाजता

फडणवीस राजभवानाकडे रवाना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.