December Born Astro: इंग्रजी कॅलेंडरनुसार डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा महिना असतो. या महिन्यात सरत्या वर्षाचा अनुभव गाठीशी बांधत नव्या वर्षाचे नियोजन केले जाते. यामुळे डिसेंबर महिना प्रत्येकासाठी वेगळा असतो. असचं काहीसं आहे डिसेंबर महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तींबाबत. कारण डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत जन्मलेले व्यक्ती आणि डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांत जन्मलेले व्यक्ती यांच्या स्वभावात आश्चर्यकारक फरक आढळतो. जाणून घेऊया डिसेंबर महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव नेमका कसा असतो.
रतन टाटा, अटल बिहारी वाजपेयी, धिरूभाई अंबानी, शरद पवार, धमेंद्र, मोहम्मद रफी, सोनिया गांधी, युवराज सिंग, उदित नारायण, अरुण जेटली या प्रसिद्ध व्यक्तींचा जन्म हा डिसेंबर महिन्यात झाला आहे. यावरुन डिसेंबर महिन्यात जन्मणाऱ्या व्यक्ती किती कतृत्वान आणि प्रभावशाली असतात याचा अंदाज येतो. प्रत्यके व्यक्ती भिन्न असते. मात्र, जन्म तारखेनुसार प्रत्येकाचे स्वभाव हे भिन्न असतात.
डिसेंबरच्या पहिल्या 15 दिवसांत जन्मलेले आळशी, हट्टी आणि गर्विष्ठ असतात. तर शेवटच्या 15 दिवसांत जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव खूपच वेगळा आहे. शेवटच्या 15 दिवसांत जन्मलेले व्यक्ती अतिशय सृजनशील असतात तसेच ते हौशी असतात. डिसेंबरच्या शेवटच्या 15 दिवसात जन्मलेले उत्तम कलाकार असतात. या महिन्यात जन्मलेल्या मुली खूपच हुशार असतात. त्या काहीशा अबोल असतात त्यामुळे त्यांच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज येत नाही. मात्र, समोच्याशी गोड बोलून आपलं काम करुन घेण्यात या मुली यशस्वी होतात.
या महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती वास्तवापेक्षा कल्पनाविश्वात जास्त रमतात. त्यांना अनेक चांगल्या संधी मिळतात. मात्र, त्यांना संधीचे सोनं करता येत नाही. डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती आकर्षक असतात. त्यांचे व्यक्तिमत्त्व समोरच्यावर छाप पाडणारे असते. प्रेमाच्या बाबतीत आणि नाते संबध जपण्याच्या बाबतीत या व्यक्ती एकनिष्ठ असतात. डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींमध्ये कमालीचा आत्नविश्वास असतो.