PM Modi Will Watch Vikrant Massey Movies The Sabarmati Report : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा स्पीकर ओम बिडला आज 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट पाहणार आहेत. बॉलिवूड अभिनेता विक्रांत मैसीनं याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे. विक्रांत मेसीच्या या चित्रपटाची स्क्रिनिंग आज संध्याकाळी 4 वाजता योगी ऑडिटोरियममध्ये होणार आहे. हे सभागृह संसद भवनाच्या आवारातच आहे.
हा चित्रपट 2002 च्या गोधरा प्रकरणावर आधारित आहे. यावेळी गुजरातच्या गोधरा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसला आग लागल्याची घटना झाली होती. या घटनेत अयोध्यावरून परतत असणारे 59 कारसेवकांचे निधन झाले. त्यानंतर राज्यात मोठ्या दंगली झाल्या आणि त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला. जेव्हा ही घटना घडली होती त्यानंतर संपूर्ण जग हे हादरलं होतं. हा चित्रपट आज पंतप्रधान मोदी पाहणार आहेत.
पंतप्रधान मोदी यांच्या आधी हा चित्रपट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा चित्रपट पाहिला होता. त्याशिवाय त्यांनी यावर प्रतिक्रिया देत सांगितलं होतं की सत्य सगळ्यांसमोर आणण्याचं करण्यात आलेला हा उत्तम प्रयाय आहे. सत्य हे नेहमीच संपूर्ण देशासमोर यायला हवं. त्यांनी पुढे सांगितलं की सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे आपल्या सोसायटीतील काही लोकांना या सत्य ला खोटं आणि जे खोटं आहे त्याला सत्यात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला, पण काही झालं तरी सत्य नेहमीच सगळ्यांसमोर येतं आणि आता सत्य समोर येत आहे.
उत्तर प्रदेश आणि काही राज्यांमध्ये 'द साबरमती रिपोर्ट' हा चित्रपट कर मुक्त दाखवणयात आला. ही घोषणा उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली होती. यावेळी अभिनेता विक्रांत मेसी देखील त्यांच्यासोबत उपस्थित होता.
हेही वाचा : राहत्या घरात सापडला अभिनेत्री शोभिताचा मृतदेह, लग्नामुळे घेतला होता अभिनयातून ब्रेक!
या चित्रपटात विक्रांत मेसीनं एका पत्रकाराची भूमिका साकारली आहे. दरम्यान, आज विक्रांतनं एक पोस्ट शेअर करत त्याच्या रिटायरमेंटची घोषणा केली आहे. त्यानं शेअर केलेल्या या पोस्टनं त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर विक्रांत मेसीसोबत या चित्रपटात रिद्धि डोगरा आणि राशि खन्ना महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, चित्रपट जवळपास 50 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे.