Nagpur Crime News : महिलेवर सामूहिक बलात्कार (Gang rape) करुन तिच्या हत्या करण्यात आली. नराधमांनी ऐवढ्यावरच न थांबना या महिलेच्या मृतदेहावर देखील बलात्कार केला आहे. महाराष्ट्राची राजधानी असेलल्या नागपूरमध्ये (Nagpur Crime) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
नागपूरच्या खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरेवाणी गावात ही भयंकर घटना घडली आहे. तिघा नराधमांनी एका महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
अबू उर्फ दिनेश उईके, नंदकिशोर उईके आणि सिद्धार्थ पाटील अशी आरोपींची नावे आहेत. तर, मृत महिला ही कापूस वेचणारी मजुर महिला आहे. या महिलेचा पती आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठीच आरोपींनी तिच्यासह हे भयानक कृत्य केल्याची प्राथमिक माहिती तपासादरम्यान समोर आली आहे.
12 जानेवारी रोजी मृत महिला शेतात एकटीच कापूस वेचत असताना हे तिघे नराधम तेथे पोहचले. या महिलेला एकटीला पाहून तिघांनी तिच्यावर जबरदस्ती केली. या तिघांनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. या महिलेने स्वत:ला नराधमांच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमांनी या महिलेवर कुऱ्हाडीने वार करुन तिची हत्या केली. एवढ्यावरच न थांबता यातील एक नराधमाने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या महिलेच्या मृतदेहावरच बलात्कार केला.
ग्रामस्थांना या महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. अवघ्या आठवड्याभरातच पोलिसांनी नराधमांना अटक केली आहे.