Elephanta Caves Gharapuri island : एलिफंटा हे भर समुद्रात असलेलं मुंबईजवळचं सर्वात फेमस पर्यटनस्थळ आहे. मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. घारापुरी बेटावर डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. एलिफंटा बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. मात्र, इथं गेल्यावर वेळेचं भान ठेवावचं लागेल. काही झालं तरी संध्याकाळी सहाच्या आत इथून बाहेर पडावंचं लागतं. जाणून घेऊया या पर्टनस्थाविषयी.
घारपुरी बेट हे निर्जन बेट आहे. महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून 6 ते 7 मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणीचे कोरण्यात आली आहे. या लेणी भव्य आकाराच्या शिल्पांसाठी प्रसिद्ध आहेत. पाषाणात खोदलेल्या या लेणी नवव्या ते तेराव्या शतकाच्या कालखंडात निर्माण करण्यात आल्या आहेत. 1987 साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते. यावरुनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले.
एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुहा या पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. मध्ययुगीन रॉक-कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक सुंदर नमुना आहे. यामध्ये एकूण 7 गुहा आहेत. 5 एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.
एलिफंटा लेणीत प्रवेशासाठी भारतीय पर्यटकांसाठी 40 रुपये प्रवेश शुल्क आहे. तर, परदेशी पर्यटकांकडून 600 रुपये प्रवेश शुल्क आकारले जाते. 15 वर्षाखालील मुलांकडून कोणत्याही प्रकारचे प्रवेश शुल्क आाकरले जात नाही.
गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी 9 वाजता एलिफंटासाठी पहिली बोट सुटते. तर, गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाला जाणारी शेवटची बोट दुपारी 3.30 वाजता सुटते. यामुळे 3.30 नंतर तुम्ही गेट वे ऑफ इंडियाला पोहचला तर तुम्हाला एलिफंटाला जाता येणार नाही. यामुळे नियोजन करुनच एलिफंटाचा प्लान बनवा.
एलिफंटाहून 12 वाजता गेट वे ऑफ इंडियाडे येणारी पहिली बोट निघते. तर, एलिफंटाहून गेट वे ऑफ इंडियाला येणारी शेवटची बोट ही सायंकाळी 6.30 वाजताची आहे. यानंतर एकही बोट येथे येत नाही. यामुळे ही शेवटची बोट सुटल्यास पर्यटकांना एलिफंटा बेटीवर अडकून पडावे लागू शकते. यामुळे एलिफंटाला फिरायला गेल्यावर वेळेचे भान ठेवावेच लागते.