Rohit Pawar : अतिज पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रावदी पक्षात उभी फूट पडली. 40 पेक्षा जास्त आमदार सोबत घेवून अजित पवार हे शिदे-फडणवीस यांच्यासह सत्तेत सहभागी झाले. यानंचर अजित पवार यांनी तेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच दावा केला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना मिळाले आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे नाव शरद पवार गटाला मिळाले आहे. यामुळे आता नव्याने पक्ष बांधणी करण्याचे आव्हान शरद पवार यांच्यासमोर आहे. रोहित पवार हे शरद पवार यांच्यासह पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. रोहित पवार यांनी शेरद पवार यांचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
दिल्लीपुढे न झुकता निधड्या छातीने लढणाऱ्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीची अविरत जनसेवेची ५७ वर्षे...
तेच तेज...
तोच जोश...
तीच ऊर्जा..
तोच उत्साह...
तीच तळमळ...
असं कॅप्शन रोहित पवार यांनी या फोटोंना दिले आहे. अनेकांनी या फोटोर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिल्लीपुढे न झुकता निधड्या छातीने लढणाऱ्या महाराष्ट्राच्या सह्याद्रीची अविरत जनसेवेची ५७ वर्षे...
तेच तेज...
तोच जोश...
तीच ऊर्जा..
तोच उत्साह...
तीच तळमळ...#साहेब@PawarSpeaks pic.twitter.com/mrJ8nv1uJw— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 22, 2024
राष्ट्रवादी पक्षासह पवार कुटुंबातही फूट पडली आहे. अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्यासह असलेले त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आपला वेगळा राजकीय मार्ग निवडला आहे. अजित पवार यांच्यासह शरद पवार यांचे अनेक विश्वासू तसेच जवळच्या नेत्यांनी त्यांची साथ सोडली आहे. काका पुतण्यामध्ये दरार आली असली तरी नातवाने आजोबांची पाठ सोडलेली नाही. रोहित पवार हे शरद पवारांचे सख्खे भाऊ अप्पासाहेब पवार यांचे नातू आहेत.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांनी आपली वेगळी चूल मांडली. पवार घराणंही राजकीयदृष्ट्या विभागलं गेलं. अजित पवार, पार्थ पवार एका बाजूला तर दुस-या बाजूला शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार अशी विभागणी झाली. त्यात आता पवार घराण्यातील आणखी एक तरुण चेहरा शरद पवारांच्या साथीला येणार आहे.. पवार कुटुंबातला आणखी एक पुतण्या राजकारणात सक्रीय होणार आहे. अजित पवारांचे धाकटे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचा मुलगा युगेंद्र पवार बारामतीत सक्रीय झाला आहे. शरद पवार म्हणतील तीच आपली भूमिका म्हणत युगेंद्र पवारांनी शरद पवारांना साथ देण्याचा निर्णय युगेंद्र पवार यांनी घेतला आहे. शरद पवारांनी सांगितल्यास बारामतीतही राजकीय दौरे करण्याचा इरादा युगेंद्र यांनी बोलून दाखवलाय. अजित पवारांच्या सख्ख्या पुतण्यानेच काकांविरोधात रणशिंग फुंकल्याचं बोललं जात आहे.