COVID Vaccination : लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांग

राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. लोक भितीच्या छायेखाली आहेत.  

Updated: Apr 10, 2021, 10:14 AM IST
COVID Vaccination : लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांग title=
संग्रहित फोटो

चंद्रशेखर भुयार / ठाणे : राज्यात कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक पाहायला मिळत आहे. लोक भितीच्या छायेखाली आहेत. लॉकडाऊन आणि लसीचा अपुरा पुरवठा यामुळे लोक त्रस्त आहेत. बदलापूरच्या लसीकरण केंद्रावर मध्यरात्रीपासून लांबच लांब रांग ( Long queue at Badlapur Vaccination Center) पाहायला मिळाली आहे.लस (COVID Vaccination) मिळवण्यासाठी मध्यरात्रीपासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे आहेत. राज्यभरात लसींचा तुटवडा जाणवत असतानाच लसीकरणासाठी मोठ्या संख्येने नागरिक लसीकरण केंद्राकडे वळत आहेत. बदलापूरच्या स्थितीवरुन त्याचा अंदाज येत आहे. सध्या राज्यात कोरोना लसीचा अपुरा पुरवठा होत आहे. तसेच कोरोनाचा उद्रेक होत असल्याने नागरिकांत भीती आहे. 

बदलापूर शहरात मध्यरात्री साडेतीन वाजल्यापासून लसीकरणासाठी ज्येष्ठ नागरिक रांगा लावताना पाहायला मिळत आहेत. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्यावतीने दुबे रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक मध्यरात्री रांगा लावत आहेत. सकाळी सहा वाजेपर्यंत 200 हून अधिक नागरिक लसीकरणाच्या सांगत होते. साडेनऊच्या सुमारास कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या तीने येथे टोकन वाटप केले जाते. त्यामुळे एका लसीसाठी तब्बल सात आठ तास रांगेत उभे राहण्याची वेळ बदलापूरकरांवर आली आहे.

बदलापूर शहरात चार ठिकाणी लसीकरण केंद्र असून दिवसाला तीनशे लस देण्याची क्षमता आहे. प्रत्येक केंद्रावर सत्तर ते ऐंशी लसीचे टोकन सकाळीच वाटले जातात.बदलापूरातल्या या केंद्रांवर लसीकरणासाठी होणारी गर्दी पाहता अनेक ज्येष्ठ नागरिकांना टोकन मिळवण्यासाठी तीन ते चार दिवस रांगा लावाव्या लागत आहेत. एकीकडे लस मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची फरफट होत असल्याचे चित्र आहे तर काही राजकीय पुढारी आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी वशेलिबाजी करत असल्याचे समोर आले आहे. 

लसीचे टोकन मिळवण्यापासून लस घेण्यापर्यंत दहा ते बारा तास लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कोरोनाचा उद्रेक पाहता लस घेतल्याशिवाय पर्याय नसल्याने नाईलाजास्तव दहा ते बारा तास खर्ची घालण्याशिवाय बदलापूरकरांकडे पर्याय नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.