पटोलेंपाठोपाठ आशिष देशमुखांचाही बंडाचा झेंडा

नाना पटोले यांच्यापाठोपाठ भाजप आमदार आशिष देशमुख यांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. 

Updated: Dec 13, 2017, 07:38 PM IST
पटोलेंपाठोपाठ आशिष देशमुखांचाही बंडाचा झेंडा  title=

नागपूर : नाना पटोले यांच्यापाठोपाठ भाजप आमदार आशिष देशमुख यांनीही बंडाचा झेंडा खांद्यावर घेतलाय. 

विधानसभेत सत्ताधारी पक्षानं शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चर्चा करण्यासाठी दिलेल्या प्रस्तावातून आशिष देशमुखांचं नाव वगळण्यात आलंय. त्यामुळं नाराज झालेल्या देशमुखांनी सभागृहात वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. 

सरकारवर टीका करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्यापासून आशिष देशमुख चर्चेत आहेत. बोंडअळीबाबतची लक्षवेधी पुढं ढकलल्यानं देशमुख संतप्त झाले असून, विरोधकांसोबत त्यांनीही वेलमध्ये घोषणाबाजी केली...

नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर

माजी खासदार नाना पटोले आणि लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेऊन राजीनामा मान्य करण्याची विनंती केली. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी पटोले यांचा राजीनामा मान्य केलाय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'मुख्यमंत्र्यांनी लायकी काढण्यापेक्षा बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी कोणते काम केले, ते सांगावे. मी मागासवर्गीय असल्यामुळे मुख्यमंत्री माझी लायकी काढू शकतात, त्यांना तसा अधिकार असल्याचा' टोमणा नाना पटोले यांनी लगावलाय.