Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडवर मकोका, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी

Santosh Deshmukh Murder MCOCA: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड घडली आहे. वाल्किम कराडवर मकोका लावण्यात आला आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 14, 2025, 02:46 PM IST
Santosh Deshmukh Murder: वाल्मिक कराडवर मकोका, आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी title=

Santosh Deshmukh Murder MCOCA: बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्याआधी कोर्टाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान एसआयटीचे अधिकारी वाल्मिक कराडला घेऊन मकोका कोर्टात गेले आहेत. हत्येचा कट रचल्याने त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. 

8 आरोपींवर मकोका

याआधी हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. मकोका लावण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुदर्शन घुले, विष्णू चाटे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सुधीर घुले, प्रतिक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांचा समावेश आहे.

दरम्यान वाल्मिकला सीआयडीने ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिकीच्या कोठडीवर आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला. कराडची कोठडी आज संपत असल्याने त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी कराडची आणखी 10 दिवस कोठडी द्यावी अशी मागणी केली तर कराडच्या वकिलांनी सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं कोर्टात पाहायला मिळालं. 

कोर्टात नेमकं काय घडलं?

दरम्यान वाल्मिकला सीआयडीने ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिकीच्या कोठडीवर आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला. कराडची कोठडी आज संपत असल्याने त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी कराडची आणखी 10 दिवस कोठडी द्यावी अशी मागणी केली तर कराडच्या वकिलांनी सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं कोर्टात पाहायला मिळालं. 

सरकारी वकिलांनी काय युक्तीवाद केला?

संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपीचा सहभाग तपासायचा असून त्यासाठी 10 दिवसाची सीआयडी कोठडी द्या, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. वाल्मिक कराडचे व्हाईस सॅम्पल घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सरकारी वकिलांनी देशाबाहेर आणि देशात वाल्मिक कराडने मालमत्ता जमवली आहे का? याचा तपास करायचा असल्याचंही कोर्टात बाजू मांडताना सांगितलं. तसेच ऑट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा असल्याने 10 दिवसांच्या कोठडीची आवश्यकता आहे. 

कराडचे वकील काय म्हणाले?

आरोपीचे वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याची बाजू मांडताना, "सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी," अशी मागणी कोर्टाकडे केली. तसेच, "सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का लागते? असा सवाल वाल्मिकच्या वकिलांनी उपस्थित केला. यावर सरकारी वकिलांनी, "आरोपीने इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का? याची देखील तपास करायचा आहे," असं कोर्टाला सांगितलं. 

आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी, "15 दिवसाची पोलीस कोठडी पुरेशी असून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाल्मिक कराडचा व्हॉइस सॅम्पल घेतला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. त्यामुळेच न्यायालयीन कोठली द्यावी," अशी मागणी आपलं अंतिम म्हणणं मांडता केली.