Walmik Karad Kej Court Argument: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशीसंबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. हा सीआयडीसाठी मोठा दणका मानला जात आहे. वाल्मिकला सीआयडीने ताब्यात घेतल्यानंतर पहिल्यांदाच वाल्मिकच्या कोठडीवर आज कोर्टामध्ये युक्तिवाद झाला. कराडची कोठडी आज संपत असल्याने त्याला केज कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकिलांनी कराडची आणखी 10 दिवस कोठडी द्यावी अशी मागणी केली तर कराडच्या वकिलांनी सरकारी वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती केल्याचं कोर्टात पाहायला मिळालं. कोर्टात नेमका काय युक्तीवाद झाला पाहूयात...
संतोष देशमुख यांच्या हत्येत आरोपीचा सहभाग तपासायचा असून त्यासाठी 10 दिवसाची सीआयडी कोठडी द्या, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. वाल्मिक कराडचे व्हाईस सॅम्पल घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सरकारी वकिलांनी देशाबाहेर आणि देशात वाल्मिक कराडने मालमत्ता जमवली आहे का? याचा तपास करायचा असल्याचंही कोर्टात बाजू मांडताना सांगितलं. तसेच ऑट्रॉसिटीच्या गुन्ह्यात तपास करायचा असल्याने 10 दिवसांच्या कोठडीची आवश्यकता आहे.
आरोपीचे वाल्मिक कराडच्या वकिलांनी त्याची बाजू मांडताना, "सीआयडी कोठडी न देता न्यायालयीन कोठडी द्यावी," अशी मागणी कोर्टाकडे केली. तसेच, "सगळा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडी का लागते? असा सवाल वाल्मिकच्या वकिलांनी उपस्थित केला. यावर सरकारी वकिलांनी, "आरोपीने इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का? याची देखील तपास करायचा आहे," असं कोर्टाला सांगितलं.
नक्की वाचा >> 'सुरेश धसांना 2 बायका...', एकेरी उल्लेख करत सदावर्ते भिडले! म्हणाले, 'धनंजय मुडेंनी 5 अपत्य..'
आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरेंनी, "15 दिवसाची पोलीस कोठडी पुरेशी असून सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. वाल्मिक कराडचा व्हॉइस सॅम्पल घेतला आहे. संपत्तीची माहिती घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. त्यामुळेच न्यायालयीन कोठली द्यावी," अशी मागणी आपलं अंतिम म्हणणं मांडता केली.
नक्की पाहा हे फोटो >> 40+ एकर जमीन, 8 घरं, 5 लाखांची गुरं अन् एकूण संपत्ती.. सुरेश धस किती श्रीमंत आहेत पाहिलं का?
कराड यांच्या वकील ठोंबरे यांनी सरकारी युक्तीवादावर आक्षेप घेतला. "15 दिवसात यांनी काय तपासले? घुले ,कराड दोन्ही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही? कराड तपासाला सहकार्य करत आहेत मग आणखी पोलीस कोठडी कशासाठी? आता आणखी कोणता तपास करायचा राहिला आहे?" असे सवाल कराडच्या वकील ठोंबरेंनी उपस्थित केला.
नक्की वाचा >> 'सुरेश धस, क्षीरसागर या प्रकरणात...', 'मुलगा निर्दोष' म्हणत वाल्मिकच्या आईचा आरोप
तसेच, "बँक खात्याचे चौकशी करण्यासाठी तंत्रज्ञान आहे. त्यासाठी आरोपीच्या चौकशीची गरज नाही," असंही वाल्मिकचे वकील म्हमाले. "या आधी वाल्मीक कराड यांची 14 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता. आता आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही," असं वाल्मिकच्या वकिलांनी सांगितलं.