Anna Hazare On Manipur: दोन दिवसांपूर्वी व्हायरल (Manipur Video) झालेल्या एका व्हिडीओमुळे देश हादरुन गेला होता. दोन तरुणींना नग्न फिरवून त्यांचा विनयभंग केल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना स्पष्टीकरण द्यावं लागलं. मात्र, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांना हिंसाचाराच्या प्रकरणात मौन बाळगलं आहे. अशातच आता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी मणिपूरच्या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
मणिपूरच्या महिलांवर जे अन्याय अत्याचार झाले ती घटना मानवतेला कलंक लावणारी घटना आहे, असं अन्ना हजारे म्हटले आहेत. अशा नराधमांना फाशीवर लटकवायला पाहिजे. मी तर म्हणेन की या घटनेमध्ये याची गरज आहे, असं म्हणत अण्णा हजारे (Anna Hazare On Manipur) यांनी संताप व्यक्त केला आहे.
स्त्री ही आपली आई आहे, बहिण आहे. विशेषतः जे देशाचं संरक्षण करण्यासाठी सीमेवर तैनात असतात. अशा एका जवानाच्या पत्नीवर असा अन्याय होणं, अत्याचार होतो, हे अजूनच गंभीर आहे, असं म्हणत अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मणिपूरमध्ये घडलेल्या या घटना म्हणजे मानवतेला लागलेला खूप मोठा कलंक असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
VIDEO | Activist Anna Hazare demands death penalty for perpetrators involved in Manipur parading incident; terms it as "blot on humanity". pic.twitter.com/YtP05u7yb1
— Press Trust of India (@PTI_News) July 22, 2023
दरम्यान, आज मी लोकशाहीच्या या मंदिराजवळ उभा आहे आणि माझं हृदय वेदना आणि संतापाने भरून आलंय. मणिपूरमध्ये जी घटना समोर आली आहे ती कोणत्याही सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणी घटना आहे. या घटनेने संपूर्ण देशाचा अपमान होत आहे. या घटनेतील गुन्हेगारांना कधीही माफ केले जाऊ शकत नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यानंतर तात्काळ कारवाई आदेश देखील देण्यात आले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही व्हिडीओ व्हायरल झाल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर कठोर पाऊलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.