दहा महिन्यात 715 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मराठवाड्यातील 715 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवले

Updated: Nov 11, 2019, 12:46 PM IST
दहा महिन्यात 715 शेतकऱ्यांच्या आत्महत्या  title=

मुंबई : राज्यात सध्या सत्ता स्थापनेचा घोळ सुरू आहे. राज्याला पूर्णवेळ मुख्यमंत्री आणि स्थिर सरकारची गरज आहे. पण राज्यात सत्तेची समीकरण वेगाने बदलत असल्याने अद्याप चित्र अस्पष्ट आहे. दुसरीकडे मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दहा महिन्यात मराठवाड्यातील 715 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवले आहे. त्यात सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये 47 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे.

याच काळात मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. अनेक शेतकऱ्यांचे हात तोंडाशी आलेलं पीक वाया गेला होता. गेल्या 2 महिन्यात  औरंगाबाद 10, जालना 10, लातूर 12, नांदेड 6, बीड 8,  उस्मानाबाद 1, अशा एकूण 47 आत्महत्या झालेल्या आहेत.