यामी गौतमी आणि आदित्य धर यांच्या घरी चिमुकल्याच आगमन झालं आहे. आदित्यने सोशल मीडियावर पोस्ट करुन गोड बातमी आणि बाळाचं नाव जाहीर केलं आहे. या नावामध्ये दोन नावं दडली आहे. तसेच हे नाव वेदांच्या नावातून घेण्यात आलं आहे. यामी गौतमीच्या मुलाच्या नावासोबतच आपण वेद पुराणातील मुलांना ठेवू शकतो अशी नावे पाहू शकतो. ज्या नावांचा विचार तुम्ही तुमच्या मुलांसाठी करु शकतो.
यामी गौतमी आणि आदित्य धरच्या घरी गोंडस बाळाचा जन्म झाला आहे. या दोघांनी ही गोड बातमी शेअर केली आहे. कपल पहिल्यांदाच आई-बाबा झाले असून हे त्यांचं पहिलंच बाळ आहे. अशावेळी हे दोघे अतिशय आनंदी आहेत.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी यामीने बाळाला जन्म दिल्याचं आदित्यने सांगितलं आहे. या पवित्र दिवसाला बाळाचा जन्म झाल्यामुळे सगळेच आनंदी आहे. बाळाच्या नावाचं नाव देखील जाहीर केलं आहे.
यामी गौतम आणि आदित्य धर यांनी त्यांच्या मुलाचे नाव 'वेदविद' ठेवले आहे. प्रेग्नेंसी पोस्ट शेअर करताना यामी गौतमने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "आम्ही सूर्या हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनापासून आभारी आहोत. आम्ही विशेषतः डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो, ज्यांच्यामुळे हा खास दिवस आपल्या आयुष्यात आला."
अभिनेत्री पुढे म्हणाली, "आता आम्ही पालक होण्याच्या या सुंदर प्रवासाला सुरुवात केली आहे आणि आम्ही आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची वाट पाहत आहोत. आम्हाला आशा आहे की, आमचा मुलगा आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी तसेच आमच्या प्रिय देशासाठी एक महान व्यक्ती बनेल. ते आमच्यासाठी अभिमानाचे प्रतीकही बनेल."
आकर्षक - आकर्षक
भाविन - विजेता, जो अस्तित्वात आहे
दर्शित - ज्याला आदर मिळतो
देवांश - देवांचा भाग
दिविज-स्वर्गात जन्मलेला
इवान - देवाने दिलेले
विहान-सकाळी
यक्षित - शाश्वत, शाश्वत
युवान-भगवान शिव
जीविन - जीवन देणारा
वरेण्यम - सर्वोत्तम - उत्तम लीडर
वेद - वेद, वेदांमधील एक नाव
भाविन - विजेता, परमेश्वराचा आशिर्वाद
विजय - जो कधीच पराजीत होत नाही असा.
आरव - आवाज, प्रेमळ, वेदांमधील एक नाव
इव्हान - इव्हान या नावाचा अर्थ वेद, वेदांमधील एक खास नाव
विहान - विहान हे नाव देखील अतिशय युनिक आहे.
देवांश - परमेश्वराचा अंश, वेदांमधील गोड नाव