Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल

women should not break coconut: प्रत्येक हिंदू धार्मिक कार्यात नारळाचा वापर आवर्जून केला जातो. कोणतीही पूजा असो किंवा कोणतेही शुभ कार्य असो, नारळ फोडण्याची परंपरा फार जुनी आहे. पण महिला नारळ फोडत नाहीत. यामागचे कारण काय आहे, हे जाणून घ्या.  

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 9, 2025, 01:09 PM IST
Hindu Ritual: महिलांनी नारळ का फोडू नये? याचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल title=
Photo Credit: Freepik

नारळाला श्रीफळ असेही म्हणतात जे अत्यंत पवित्र फळ मानले जाते. हिंदू धर्मात याला फार महत्त्व आहे. नारळाचा उपयोग प्रत्येक धार्मिक आणि शुभ कार्यात होतो. हिंदू धर्मानुसार, कोणत्याही प्रकारच्या पूजा किंवा हवनात नारळ नक्कीच वापरला जातो. घरातील कोणत्याही सणासुदीची पूजा असो किंवा घरोघरी लग्नसमारंभ असो किंवा नवीन गाडी खरेदी असो, प्रत्येक प्रसंगी पूजेत नारळ ठेवला जातो. अगदी फिरायला जातानाही गाडी समोर नारळ फोडला जातो. पण पूजेचा हा नारळ फक्त पुरुषच फोडतात, महिलांना नारळ फोडताना तुम्ही कधी बघितलं नसेल.  हिंदू धर्मात ही प्रथा वर्षानुवर्षे प्रचलित आहे. तुम्ही अनेकदा एखाद्या पुरुषाला किंवा मुलाला नारळ फोडताना पाहिलं असेल. पण महिलांना नारळ  फोडयाला का देत नाहीत, असा प्रश्न मनात निर्माण होतो.  महिलांसाठी नारळ फोडणे खरोखरच अशुभ आहे का आणि त्यामागचे कारण काय? याबद्दल जाणून घेऊयात. 

नारळाचे महत्व

नारळ जेवणात वापरले जातेच. यामध्ये अनेक फायदे आणि औषधी गुणधर्म आढळतात. नारळ विविध प्रकारच्या गुणधर्मांनी समृद्ध आहे आणि अनेक रोगांच्या उपचारांमध्ये देखील वापरला जातो. याशिवाय नारळ हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे फळ आहे असेही म्हटले जाते. सनातन धर्मानुसार, जर एखाद्या व्यक्तीने हे पवित्र फळ पूजेमध्ये देवी-देवतांना अर्पण केले तर त्याच्या पैशाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात.

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: कोण असतात 'तंगटोडा साधू'? ज्याची मुलाखत IAS पेक्षाही असते अवघड, जाणून घ्या प्रोसेस

 

महिलांना नारळ फोडायला का देत नाहीत?  

शास्त्रानुसार नारळ हे बीज मानले जाते. असे मले गेले आहे की जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर त्याचा तिच्या गर्भाशयावर नकारात्मक परिणाम होतो. याशिवाय, धर्मग्रंथांमध्ये असाही उल्लेख आहे की, संपूर्ण पृथ्वीवर प्रथमच भगवान विष्णूने देवी लक्ष्मीसोबत नारळ फळाच्या रूपात पाठवले होते. शास्त्रानुसार नारळ फोडणे म्हणजे बिया फोडण्यासारखे आहे. नारळावर फक्त देवी लक्ष्मीचा अधिकार आहे, त्यामुळे महिलांना नारळ फोडणे चांगले  मानले जाते.

हे ही वाचा: Maha Kumbh 2025: नागा साधूंना थंडी का लागत नाही? जाणून घ्या मनोरंजक उत्तर

नारळ न फोडण्याची गोष्ट आहे मुलाशी संबंधित 

स्त्रिया मुलांना जन्म देतात. असे मानले जाते की ते केवळ बीजाच्या रूपात संतती निर्माण करतात. त्यामुळे महिलांनी कधीही नारळ फोडू नये.  जर एखाद्या महिलेने नारळ फोडला तर असे केल्याने तिच्या गर्भाशयात किंवा मुलाच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात असे मानले जाते. स्त्रिया मुलांना जन्म देतात त्यामुळे हे जगाचे चक्र सतत चालू असते. यामुळे महिलांनी चुकूनही नारळ फोडू नये असे म्हंटले जाते. 

हे ही वाचा: भारतातील 'हे' सुंदर ठिकाण आहे ढगांनी वेढलेले, अनोखा अनुभवासाठी आवर्जून द्या भेट! जाणून घ्या प्लॅन

 

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)