चिया सीड्सला त्याच्या पौष्टिक गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहेत. यात ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स, फायबर आणि अँटी ऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात असतात. मात्र चिया सीड्स हे संपूर्णपणे हेल्दी नसून त्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा आहेत. तेव्हा चिया सीड्सच्या सेवनाने आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात याबाबत जाणून घेऊयात.
चिया सीड्समध्ये फायबरची उच्च मात्रा असते. फायबर हे खरतर पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी लाभदायक ठरतं. मात्र अचानक भरपूर प्रमाणात चिया सीड्सचे सेवन केल्याने पोटात गॅस, सूज, ऍसिडिटी इत्यादींचा त्रास होऊ शकतो. खास करून ज्या व्यक्तींची पचनशक्ती कमजोर असते अशा लोकांना हा त्रास लवकर जाणवतो. तेव्हा चिया सीड्सला आहारात हळूहळू समावेश करावा.
काही लोकांना चिया सीड्सच्या सेवनाने त्वचेवर एलर्जी, खाज, सूज तसेच लाल चट्टे उठतात. जर तुम्हाला चिया सीड्सच्या सेवनानंतर कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होत असेल तर याचं सेवन करणं लगेचच बंद करा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.
चिया सीड्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात, जे रक्त पातळ करण्यासाठी मदत करते. परंतु जर तुम्ही आधीपासूनच रक्त पातळ होण्याची औषध खात असाल तर चिया सीड्सच्या अत्याधिक सेवनाने विपरीत परिणाम होऊ शकतो आणि समस्या वाढू शकते. तेव्हा डॉक्टरांच्या सल्ल्याने चिया सीड्सचे सेवन करावे.
चिया सीड्सचं जास्त सेवन हे हृदयाच्या समस्या वाढवते. चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असते म्हणून याचे सेवन संतुलित प्रमाणातच करावे. अन्यथा हे हृदयाच्या समस्या वाढण्यास कारणीभूत ठरून हाय ब्लड प्रेशरचं कारण ठरते.
चिया सीड्समध्ये कॅलरीज चांगल्या प्रमाणात असतात. तेव्हा जर जास्त प्रमाणात चिया सीड्सचे सेवन केले तर वजन वाढू शकते, विशेषतः जर तुम्ही संतुलित आहाराकडे लक्ष दिले नाही. म्हणून, चिया सीड्स मर्यादित प्रमाणात आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून वापरल्या पाहिजेत.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)