पालक आपल्या मुलांसाठी विशेष नाव शोधत असतात. कारण हीच मुलांची पहिली ओळख असते. काही पालक मुलांसाठी विशिष्ट अक्षरावरुन नाव ठेवतात. जसे की, एखाद्या विशिष्ट अक्षरावरुन नाव निवडणे. किंवा पालकांच्या नावावरुन नवीन नाव तयार करणे. किंवा एकाच अक्षरावरुन कुटुंबातील सगळ्या व्यक्तींची नावे ठेवणे. तुम्ही देखील बाळासाठी 'B' अक्षरावरुन नाव निवडू शकता.
बंदिनी - नात्यातील बंध, स्वाभाविकपणा असा या नावाचा अर्थ आहे. बंदिनी या नावाचा मुलीसाठी नक्की विचार करु शकता.
बिनिता - बिनिता हे नाव युनिक आहे. बिनिता या नावाचा अर्थ आहे विनम्र. मुलींसाठी हे नाव युनिक असेल.
बृन्दा - वृन्दा या नावावरुन हे नाव घेण्यात आलं आहे. ब अक्षरावरुन मुलींचं नाव ठेवायचा असेल तर याचा नक्की विचार करा.
बारिशा - पाऊस ज्या व्यक्तीला आठवत असेल त्याने मुलीचं नाव बारिशा ठेवू शकता.
बैशाखी - बैशाखी हा एक सण आहे. मुलीचं नाव या सणावरुन ठेवू शकता.
बंदिता - बंदिनी, बंदिता असं नाव मुलीसाठी निवडू शकता.
बांधवी - बांधवी हे नाव अतिशय खास आहे. प्रेमळ, मैत्रीपूर्ण नातं असा या नावाचा अर्थ आहे.
बबिता - बबिता हे नाव मुलीसाठी निवडू शकता.
बरखा - बरखा हे नाव लोकप्रिय पत्रकार व्यक्तीचं आहे. तडफदार असं हे व्यक्तीमत्त्व तुमच्या मुलीमध्ये हवं असेल तर या नावाचा नक्की विचार करा.
'ब' अक्षरावरुन मुलांची नावे
बवेश - ईश्वराचे रुप, कृपा असं या नावाचं अर्थ आहे.
बिदित - बुद्धिमान, हुशार असा अर्थ बिदित नावाचा आहे.
बसंत - ऋतु, ताजेपणा हा या नावाचा अर्थ आहे.
बलज - चमक, मजबूत अर्थाचं नाव आहे बलज. हे नाव थोडं युनिक आहे.
बमन - महान व्यक्तिमत्व असा बमन नावाचा अर्थ आहे.
बृजेश - बृज सिनेमाचा राजा, भगवान, परमेश्वराचं रुप असा बृजेश नावाचा अर्थ आहे.
बादल - आकाश, नभ असा या नावाचा अर्थ आहे. हे हिंदी नाव वाटत असलं तरीही याचा विचार करायला हरकत नाही.
बिपिन - बिपिन या शब्दाचा अर्थ मुक्त असा आहे.
बलराज - ब अक्षरावरुन मुलाला द्या बलराज हे नाव.