डार्क अंडरआर्म्सपासून मिळवा झटपट सुटका; फॉलो करा 'या' सोप्या टीप्स

स्लीव्हलेस कपडे घालताना अंडरआर्म्सचा काळेपणा लपवण्याची गरज वाटते. पण काळजी करू नका, कारण काही सोपे  घरगुती उपाय या समस्येपासून तुम्ही अंडरआर्म्सच्या काळपणापासून सुटका मिळवू शकता.  

Updated: Jan 31, 2025, 05:00 PM IST
डार्क अंडरआर्म्सपासून मिळवा झटपट सुटका; फॉलो करा 'या' सोप्या टीप्स title=

Home remedies for dark underarms: काखेतील काळेपणा वाढला की स्लीव्हलेस कपडे घालयला अवघड वाटते. काही करणास्तव हात वर करायलादेखीव लाज वाटते. हे अंडरआर्म्स काळे असतील तर दुर्गंध येऊ लागते. अंडरआर्म्स काळे पडण्याची अनेक कारणे असू शकतात. हार्मोन्समधील बदल, वारंवार शेव्हिंग, डिओड्रंट्सचा जास्त वापर, घाम आणि मृत त्वचा ही त्याची मुख्य कारणे आहेत. योग्य स्किनकेअर आणि काही नैसर्गिक उपायांमुळे हा काळेपणा दूर करता येतो. तर मग, जाणून घ्या काही घरगुती उपाय जे तुमच्या अंडरआर्म्सना चमकदार बनवतील.

लिंबू आणि मध

लिंबामध्ये नैसर्गिक ब्लिचिंगचे गुणधर्म असतात. हे त्वचेला उजळ बनवण्यास मदत करतात. तसेच मध हा एक उत्तम मॉइस्चरायझर आहे. हे त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

कसा करावा वापर?

  • एक चमचा लिंबाचा रस आणि 1 चमचा मध एकत्र मिसळा..
  • हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा आणि 10-15 मिनिटे तसेच ठेवा.
  • नंतर कोमट पाण्याने धुवा.
  • हा उपाय आठवड्यातून 2-3 वेळा करा.

बेकिंग सोडा आणि पाणी

बेकिंग सोडा हा नैसर्गिक एक्सफोलिएटर आहे. हा पदार्थ त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो आणि अंडरआर्म्स स्वच्छ व उजळ बनवतो.

कसा करावा वापर?

  • 1 चमचा बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिसळून पेस्ट तयार करा.
  • ही पेस्ट अंडरआर्म्सवर लावा आणि हलक्या हाताने 2-3 मिनिटे मसाज करा.
  • कोमट पाण्याने धुवा.
  • आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय करा.

विटामिन ई तेल

विटामिन ई तेल त्वचतील घाण काढून टाकण्यास मदत करते आणि त्वचेला आवश्यक ते पोषण आणि मॉइस्चरायझेशन देते.

कसा करावा वापर?

  •  एक विटामिन ई कॅप्सूल फोडा आणि त्यातील तेल बाहेर काढा.
  •  हे तेल अंडरआर्म्सवर हलक्या हाताने लावा आणि रात्रभर तसेच ठेवा.
  •  सकाळी धुवा.
  •  चांगल्या परिणामांसाठी हा उपाय रोज करा.

नारळ तेल आणि हळद

नारळ तेलामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, तर हळद त्वचेला ग्लो देण्यास मदत करते.

कसा करावा वापर?

  • 1 चमचा नारळ तेल आणि 1 चमचा हळद पावडर एकत्र करा.
  • हे मिश्रण अंडरआर्म्सवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा.
  • 10-15 मिनिटांनी धुवा.
  • आठवड्यातून 2-3 वेळा हा उपाय करा.

डार्क अंडरआर्म्स टाळण्यासाठी हे उपाय करा

  • अंडरआर्म्स स्वच्छ आणि कोरडे ठेवा.
  • केमिकल्स असलेले डिओड्रंट्स आणि परफ्यूम्स टाळा.
  • वॅक्सिंग किंवा शेव्हिंग करताना त्वचेची काळजी घ्या.
  • पुरेशी झोप घ्या आणि संतुलित आहार घ्या.
  • घरगुती स्क्रब वापरून नियमितपणे त्वचा एक्सफोलिएट करा.

हे सोपे घरगुती उपाय तुमच्या अंडरआर्म्सचा रंग हलका करण्यास आणि त्वचा मऊ ठेवण्यास मदत करतील. आता तुम्ही बिनधास्त स्लिव्हलेस कपडे घालु शकता.

(Disclaimer: इथे देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)