अवघ्या काही मिनिटांमध्ये बाथरूम होईल चकाचक, टाईल्स दिसतील नव्या सारख्या, वापरा 3 टिप्स

Bathroom Tiles Cleaning Tips : तुम्ही घरगुती आणि स्वस्त मस्त अशा टिप्स वापरून बाथरूमची स्वच्छता करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल आणि फार कष्ट सुद्धा पडणार नाहीत. 

पुजा पवार | Updated: Jan 21, 2025, 07:22 PM IST
अवघ्या काही मिनिटांमध्ये बाथरूम होईल चकाचक, टाईल्स दिसतील नव्या सारख्या, वापरा 3 टिप्स  title=
(Photo Credit : Social Media)

Bathroom Tiles Cleaning Tips : घराची साफसफाई करताना सर्वात वेळ खाऊ आणि त्रासदायक काम म्हणजे बाथरूमची स्वच्छता करणे. बाथरूम टाईल्सवर (Bathroom Tiles) बऱ्याचदा घाण, फंगस इत्यादी जमल्यामुळे त्याच्यावरची चमक दूर होते. बाजारात अनेक केमिकलयुक्त क्लिनर आहेत मात्र त्यामुळे टाईल्स खराब होऊ शकतात तसेच काहीवेळा असे क्लिनर्स आरोग्यावरही वाईट परिणाम करतात. अशावेळी तुम्ही घरगुती आणि स्वस्त मस्त अशा टिप्स वापरून बाथरूमची स्वच्छता करू शकता, ज्यामुळे तुमचा वेळ देखील वाचेल आणि फार कष्ट सुद्धा पडणार नाहीत. 

तुम्हाला अशा तीन सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे टाइल्स काही मिनिटांत नव्या सारख्या चमकू लागतील. 

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर : 

बेकिंग सोडा आणि व्हिनेगर हे एक असे मिश्रण आहे ज्यामुळे बाथरूम टाईल्समध्ये जमलेली घाण, फंगस इत्यादी लवकर दूर होते. स्वच्छता करण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये बेकिंग सोडा घ्या आणि त्यामध्ये पांढर व्हिनेगर टाका. मग हे मिश्रण टाईल्सवर लावा आणि 10 ते 15 मिनिटं असंच राहुद्यात. मग  ब्रश घेऊन हलक्या हाताने टाईल्स स्वच्छ करा आणि मग पाण्याचा वापर करा. तुमच्या टाईल्स अगदी नव्या सारख्या दिसू लागतील. 

लिंबू आणि मीठ : 

लिंबू आणि मिठाचं एकत्रित मिश्रण टाईल्स स्वच्छ करण्याच्या कमी येतं. लिंबूमध्ये साइट्रिक ऍसिड असते तर मिठात स्क्रबिंग प्रॉपर्टी टाईल्सवरील डाग दूर करतात. अर्धा लिंबूवर थोडं मीठ टाकून घाण झालेल्या टाईल्सवर घास. 10 मिनिटांनी याला पाण्याने धुवा. अशाप्रकारे बाथरूम टाईल्स स्वच्छ होतात आणि त्याचा सुगंध सुद्धा येऊ लागतो. 

हेही वाचा : QR कोडचा फुल फॉर्म माहितीये का? दिवसातून 10 वेळा स्कॅन करणाऱ्यांनाही माहित नसेल

डिटर्जेंट आणि गरम पाण्याचा वापर : 

डिटर्जेंट आणि गरम पाण्याचं कॉम्बिनेशन  टाईल्सवर जमलेली ग्रीस आणि डाग हटवण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. रस्ताही सर्वात आधी गरम पाण्यात एक चमचा डिटर्जेंट पावडर टाका. मग स्पंजच्या मदतीने एकत्र मिक्स करून सदर मिश्रण टाईल्सवर लावा. ५ मिनिटांसाठी मिश्रण असच टाईल्सवर लावून सोडून द्या. मग थोड्यावेळाने स्क्रब करून धुवून टाका.