Saif Ali Khan Big Decision: बॉलिवूडचा छोटा नवाब सैफ अली खानला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलाय. सहा दिवसांपूर्वी वांद्रेतल्या सतगुरु नावाच्या इमारतीत सैफवर चाकूहल्ला झाला होता. यामुळे सैफसह संपूर्ण कुंटुब दहशतीमध्ये आहे. घरी येण्यापूर्वीच सैफने सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेतला. सैफने लोकप्रिय अभिनेता रोनित रॉय याच्यावर सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे. सैफच्या घरी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
मोहम्मद शरिफूल असे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. 16 जानेवारीला लुटीच्या हेतूनं सैफच्या घरात प्रवेश केला होता.झालेल्या झटापटीत सैफ गंभीर जखमी झाला होता. सैफच्या हाताला आणि मानेला गंभीर दुखापत झाली होती. डॉक्टरांनी त्यांच्या मानेत अडकलेला चाकूही बाहेर काढला. चाकूहल्ल्यातून सैफ सावरला असून स्वतः चालत लीलावती हॉस्पिटलबाहेर आला.
हल्ल्यानंतर सैफ आणि त्याच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेतल्याचे दिसत आहे. सुरक्षा यंत्रण अधिक अलर्ट झाली आहे. सैफच्या घराबाहेरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. त्याच्या घरात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. घराच्या बाल्कनीमध्ये स्टिल ग्रीलची जाळी बसवण्यात आली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी सोसायटीची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. आता सैफच्या बिल्डिंगमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जाणार आहे.
रुग्णालयातुन घरी आल्यानंतर सैफने रोनित रॉयची सुरक्षा एजन्सीची नियुक्ती केली असल्याचे समजते. रोनितने सैफच्या घराचा आढावा घेतला तसेच. सैफच्या ताफ्यातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. फक्त सैफच नाही तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला रोनितच्या सुरक्षा एजन्सीमार्फत सुरक्षा पुरवली जाणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
अभिनेता रोनित रॉय हा एस (Ace) नावाच्या सिक्युरिटी कंपनीचा मालक आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान यासह अनेक स्टार्सच्या सुरक्षेची जबाबदारी रोनित रॉय याच्या एस (Ace) सिक्युरिटी कंपनीवर आहे. यामुळेच आता सैफ अली खान याने देखील सुरक्षेसाठी रोनित रॉय याच्या सुरक्षा एजन्सीची नियुक्ती केली आहे.