तुम्ही रोज वापरता त्या टुथब्रश, शॉवरमध्ये असंख्य बॅक्टेरियांचा वावर; नवं संशोधन धडकी भरवणारं

Bacteria In Toothbrush: तुम्ही रोज वापरत असणाऱ्या टुथब्रश आणि शॉवरमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरसने घर केलं आहे. हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल मात्र, एका अभ्यासात हे उघड झालं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 15, 2024, 10:46 AM IST
तुम्ही रोज वापरता त्या टुथब्रश, शॉवरमध्ये असंख्य बॅक्टेरियांचा वावर; नवं संशोधन धडकी भरवणारं title=
Huge Number Of Viruses And Bacteria Living On Your Toothbrush & Shower Heads

Bacteria In Toothbrush: अमेरिकेतील एका रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. तुम्ही रोज वापरत असणाऱ्या टुथब्रश आणि शॉवर हेड्समध्ये अनेक व्हायरस आणि बॅक्टेरियांनी घर बनवलं आहे. यातील काही व्हायरसची नावदेखील वैज्ञानिकांसाठी नवीन आहेत. Frontiers in Microbiomes च्या अभ्यासातून हा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. नॉर्थनेस्टर्न विद्यापिठाच्या अभ्यासातून हा दावा केला आहे. एक दिलासादायक बाब म्हणजे, यातील काही बॅक्टेरिया आणि व्हायरस आरोग्यासाठी हानिकारक नाहीयेत. मात्र, काही बॅक्टेरिया हे वस्तु साफ केल्यानंतरही पृष्ठभागावर राहतात. बॅक्टेरिया आणि फंगस साफ केल्यानंतरही पुन्हा नवीन तयार होतात. त्यामुळंच डॉक्टर नियमित टुथब्रश बदलण्याची व बाथरुम साफ करण्याचा सल्ला देतात. 

संशोधकांनी अमेरिकेतील 92 शॉवर हेड्स आणि 34 टुथब्रशचा अभ्यास केला आहे. त्यांनी अॅडव्हान्स DNA तंत्रज्ञानाची मदतीने व्हायरस आणि बॅक्टेरियांचा अभ्यास केला आहे. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील एरिका हार्टमॅन यांनी म्हटलं आहे की, 'आम्हाला जितके व्हायरस सापडले आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. आम्हाला काही असे व्हायरसदेखील आढळले आहेत. ज्याच्याबाबतीत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. तर, यातील काही असे व्हायरस आहेत जे आम्ही कधीच पाहिले नाहीयेत.' 

संशोधनात टुथब्रश आणि शॉवर हेडमध्येही बॅक्टेरिया सापडले आहेत. असे विषाणू जिवाणू पेशींना संक्रमित करतात आणि त्यांच्या आत स्वतःच्या प्रती तयार करतात. बॅक्टेरिया हे एक समुदाय तयार करतात. ज्याचा आपल्या आरोग्यावरदेखील परिणाम होतो. नवीन आढळलेले व्हायरस हानिकारक बॅक्टेरिया नियंत्रित करण्यास मदत करु शकतात. शॉवर हेडच्या तुलनेत टुथब्रशवर जास्त व्हायरस सापडले आहेत. कारण टुथब्रशवर सापडलेले बॅक्टेरिया हे तोंडावाटे व भोजनाच्या कणातून येतात. तर शॉवर हेडवर सापडणारे बॅक्टेरिया पर्यावरणातून येतात. 

व्हायरस आणि बॅक्टिरिया आपल्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. हार्टमॅन यांनी म्हटलं आहे की, सूक्ष्मजीव प्रत्येक ठिकाणी आहेत मात्र यातील अधिकांक्ष मानवी शरीरासाठी धोकादायक नसतात. तुम्ही त्यांच्यावर जंतुनाशकांची फवारणी कराल तितकीच त्यांच्यात जास्त प्रतिकारशक्ती निर्माण होते.